संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या घटना दिल्लीतील पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत एका परदेशी महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. या ब्रिटीश तरुणीवर देशाची राजधानी दिल्लीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे दिल्लीसह देशातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या महिपालपूर भागात मंगळवारी (11 मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी पीडित ब्रिटीश महिला भारतात आली होती. मात्र, त्याला भेटल्यानंतर तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कैलास असे या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. कैलासला इन्स्टाग्रामवर रिल बनवण्याचा आवड आहे. याचसंदर्भात त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती.
A man was arrested on charges of rape with a British woman in a Mahipalpur hotel in Delhi. His accomplice was arrested on charges of molestation. The woman who was friends with the man through social media had come to Delhi from the UK to meet him. The information about the…
— ANI (@ANI) March 13, 2025
ब्रिटीश तरुणी भारतात महाराष्ट्र आणि गोव्यात पर्यटनासाठी आली होती. यावेळी तिने सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या मित्राला म्हणजे कैलासला भेटण्यासाठी फोन केला. मात्र, आरोपी कैलासने आपण महाराष्ट्रात येऊ शकत नसल्याचे सांगून पीडितेला दिल्लीला बोलावून घेतले. इन्स्टाग्रामवरही चांगली मैत्री झाल्याने तरुणी त्याच्या विनंतीवरुन त्याला भेटण्यासाठी दिल्लीला गेली. दरम्यान पीडित तरुणीने दिल्लीत आल्यानंतर महिलापूर भागात एका हॉटेलमध्ये रुम बूक केली. त्यानंतर तिने आरोपी कैलासला भेटण्यासाठी बोलावले. या दरम्यान आरोपी आपला मित्र वासिमला घेऊन तरुणीला भेटायला गेला.
हॉटेलमध्ये तिघांनी मद्यपान केले. नंतर आरोपीने तरुणीला सोडण्याच्या बहाणा केला आणि तिच्या रुममध्ये गेला. तिथे पीडितेचे लैंगिक शौषण केले. या प्रकरणानंतर पीडित महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रत्यन केला. यामुळे आरोपीने त्याचा मित्र वासिमलाही रुममध्ये बोलावले. वासिमने तरुणीचा विनयभंग केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या सर्व घटनेची माहिती ब्रिटीश दूतावासाला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज कोर्टात आरोपीला सुनावणीसाठी सादर केलं जाणर आहे.