
crime (फोटो सौजन्य: social media)
तारा तोडायचा मोबदला मिळेल! त्यात जीव गेला
दत्ता हा एका इलेक्ट्रिक काम करत नव्हता किंवा त्याला तशा कोणत्याही कामाचा अनुभव नव्हता. तरी ही दत्तला पैसे मिळतील म्हणून तानाजी जाधव हा दत्तच्या घरी आला होता. तानाजी जाधव आणि जितेंद्र म्हस्के हे दोघे जण आले होते. त्याने सुरुवातीला कामाला नकार दिला. मात्र त्याचा मोबदला तुला मिळेल त्या मध्ये कोणताही करेंट नाही. तू आमच्यासोबत चल म्हणून त्याला सोबत घेवून गेले आणि शिडीवरून पोलवर चढवला असता त्याला धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने धाराशिव जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
बहिणीचा आरोप
तानाजी जाधव यांच्या शेतातून रिन्यू कंपनीची पवनचक्की तारा गेल्या आहेत. या तारा तोडून त्याला कंपनीला इशारा द्यायचा होता. मात्र त्यात करेंट आहे हे माहिती असताना पण त्याने हे कृत्य करायला भाग पाडल म्हणून तानाजी जाधव आणि जितेंद्र म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणीने मागणी केली आहे. या दोघांवर कठोर कारवाई करा. यांच्या स्वार्थासाठी माझा भाऊ गेला आहे अस म्हणत तिने हंबरडा फोडला आहे.
Ans: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात.
Ans: पवनचक्कीच्या तारांना करंट असल्याने विजेचा धक्का लागला.
Ans: तानाजी जाधव आणि जितेंद्र म्हस्के.