Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Dharashiv: नव्या घरात जाण्याची तयारी अन् दिवाळीचा आनंद एका क्षणात खाक! धाराशिवच्या येडशीत पहाटे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा धुराने गुदमरून करुण अंत; गावकऱ्यांनी जेसीबीने भिंत फोडूनही वाचवता आले नाही पोटचे गोळे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 02:00 PM
Dharashiv: "पुण्याहून सणाला घरी आली अन्..." फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने...

Dharashiv: "पुण्याहून सणाला घरी आली अन्..." फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने...

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवच्या येडशीत आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
  • मुख्य दरवाजा बंद असल्याने सर्वजण घरातच अडकून होरपळले
  • ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न; पोलीस व अग्निशमन दल तपास करत आहेत
Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील येडशी गावात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका घराला अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी आगीत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांतील ६ जणांचा घरातच गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळच आग लागल्याने आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही, ज्यामुळे हा मोठा अनर्थ घडला. या घटनेने संपूर्ण येडशी गावावर आणि धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Sindhudurg Accident: “सणासुदीच्या दिवसांत घाला घातला…” दोडामार्गात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार; ओळखीचे काम सुरू!

तीन पिढ्या संपल्या; दुर्दैवी मृतांची नावे

या दुर्दैवी अपघातात उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय १५) या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत गायत्री ही पुण्यात शिक्षण घेत होती. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी ती अलीकडेच येडशीतील आपल्या घरी आली होती. मात्र, ही दिवाळी तिची अखेरची दिवाळी ठरली.

हेही वाचा: Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…

नवीन घरात जाण्यापूर्वीच काळाचा घाला

करंडे कुटुंबाने सध्या राहत असलेल्या जुन्या घराच्या पाठीमागेच एक नवीन सुंदर घर बांधायला घेतले होते. या नव्या घराचे काम अगदी अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे कुटुंब तिथे राहायला जाणार होते. मात्र, नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झेप घेतली. पहाटे अडीच वाजता आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बोअरवेल सुरू करून, बादल्यांनी पाणी मारून तसेच थेट जेसीबीच्या साहाय्याने घराची मागची भिंत फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीचा भडका आणि धूर इतका तीव्र होता की आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तोपर्यंत सर्वांचा प्राण गेला होता.

आगीची भयंकर तीव्रता

ही आग इतकी भीषण होती की घरासमोर असलेले उंच पिंपळाचे झाड खोडापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे करपून गेले, तर नारळाचे झाडही जळून खाक झाले. “आम्ही कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, भिंती फोडल्या पण आग प्रचंड होती. माणसं देवासारखी चांगली होती, त्यांना वाचवता आले नाही याचे मोठे दुःख आहे,” अशा भावना प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले असून, आगीचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्दैवी आगीची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात घडली.

  • Que: आगीच्या या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: या घटनेत एकाच करंडे कुटुंबातील ६ जणांचा (तीन पिढ्यांचा) मृत्यू झाला आहे.

  • Que: गावकऱ्यांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले?

    Ans: गावकऱ्यांनी बोअरवेलचे पाणी मारून, घरावर चढून आणि जेसीबीने मागची भिंत फोडून कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Dharashiv yedshi house fire tragedy six family members dead sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Death Case
  • Dharashiv News
  • Fire News

संबंधित बातम्या

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
1

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…
2

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…

Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू
3

Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
4

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.