Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…

Pub Fight Case: पबमध्ये डान्स करताना शर्ट हवेत फिरवला म्हणून पुण्यात तुफान राडा! पबबाहेर पडताच तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून प्राणघातक हल्ला; विमानतळ पोलिसांनी महिलेसह चौघांच्या ठोकल्या बेड्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 08, 2026 | 09:31 AM
Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्...

Pub Fight Case: पुण्यात पबमधील डान्सवरून तुफान राडा! शर्ट हवेत फिरवल्याने झाला वाद; तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्...

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात शर्ट फिरवण्याच्या वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला
  • पबमधील वादाचा राग धरून आरोपींनी रस्त्यात गाठले
  • जखमीच्या तक्रारीवरून एका महिलेसह चौघांना अटक
Pub Fight Case: पुण्यातील विमाननगर परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फिनिक्स मार्केट सिटी परिसरातील एका पबमध्ये डान्स करताना झालेला वाद इतक्या टोकाला गेला की, एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नाही तर त्याच्यावर झाडाच्या फांदीनेही प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी त्वरित कारवाई करत एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.

हेही वाचा:  Fire News: दिवाळीत मुंबई हादरली! अंधेरीतील ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर भीषण आग; गोरेगावमध्येही फटाक्यांमुळे उडाली धावपळ!

शर्ट हवेत फिरवल्यावरून वाद पेटला

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक मधुकर कोंडे (वय २६, रा. वडगाव शेरी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋतिक एका खासगी कंपनीत कामाला असून, गुरुवारी रात्री तो आपल्या प्रशांत नावाच्या मित्रासोबत पबमध्ये गेला होता. पबमध्ये दोघेही डान्स करत असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास ऋतिकने आपला शर्ट काढून हवेत फिरवण्यास सुरुवात केली. या क्षुल्लक कारणावरून त्याचा पबमध्ये उपस्थित असलेल्या आरोपींसोबत जोरदार वाद झाला.

रस्त्यावर गाठून डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू

काही वेळानंतर ऋतिक आणि त्याचा मित्र पबमधून बाहेर पडले. मात्र, पबमधील वादाचा राग आरोपींच्या मनात कायम होता. त्यांनी ऋतिकचा पाठलाग करून त्याला रस्त्यात गाठले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून थेट ऋतिकच्या डोक्यात घातला आणि झाडाच्या फांदीने त्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा: Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

महिलेसह चौघांना बेड्या

या जीवघेण्या हल्ल्यात ऋतिक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याने तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जेम्स फिलिप मकासरे (४१), प्रिया जेम्स मकासरे (३२), भारत संजय ठाकूर (४०) आणि वेदांत शैलेंद्र भालेराव (२६) या चौघांनाही जेरबंद केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली?

    Ans: ही घटना पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका पबबाहेर घडली असून, याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: जखमी तरुणाचे नाव काय आहे आणि तो काय करतो?

    Ans: जखमी तरुणाचे नाव ऋतिक मधुकर कोंडे (वय २६) असे असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी कोणाला अटक केली आहे?

    Ans: पोलिसांनी जेम्स मकासरे, प्रिया मकासरे, भारत ठाकूर आणि वेदांत भालेराव या एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.

Web Title: Pub fight casepune vimannagardance brawl head attack sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Attack
  • Crime . Crime News
  • pune crime case

संबंधित बातम्या

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…
1

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
2

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!
3

Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण
4

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.