Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: धुळे व नांदेडमध्ये मोठी कारवाई! 122 गुंठ्यातील गांजाची शेती जाळून नष्ट, 45 किलो गांजा जप्त

धुळे जिल्ह्यातील जामन्या पाणी गावात वनहद्दीत 122 गुंठ्यातील 2,125 किलो गांजा नष्ट करून 1.06 कोटींचा मुद्देमाल जाळला. नांदेडच्या किनवट परिसरात तुरीच्या शेतातून 45 किलो गांजा जप्त, एकाला ताब्यात; पोलिसांचा पुढील तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 08, 2025 | 08:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती; वनहद्दीत गांजाची शेती आढळली
  • 122 गुंठ्यातील 2,125 किलो गांजा नष्ट, किंमत सुमारे 1.06 कोटी
  • नांदेडमध्ये तुरीच्या शेतात लपवून ठेवलेला 40-45 किलो गांजा जप्त
धुळे: धुळे व नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिरपूर तालुक्यातील जामन्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाईत वनविभागाच्या हद्दीतील तब्बल 122 गुंठे जागेतील अंदाजे 2 हजार 125 किलो गांजाची झाडे नष्ट करून तब्ब्ल १ कोटी ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

कशी केली कारवाई?

शिरपूर तालुक्यातील जमण्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी पाहणी केली तेव्हा वनविभागात गांजाची लागवड करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी प्रशासनाच्या निर्देशानुसार गांजाची झाडे जाळून नष्ट केली आहे.

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, तसेच आणखी कुठे अश्याप्रकारे गांजाची शेती केली जात आहे का? पोलिसांनी या प्रकरणाबाबत अधिकची चौकशी सुरु केली आहे.

नांदेडमध्ये तुरीच्या शेतात कारवाई

नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवानी व झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या शेतीत इस्लापूर पोलिसांनी धाड टाकली. तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली ४० ते ४५ किलोपर्यंतची गांजाची झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे कारवाई सुरु आहे. गुप्त माहितीनुसार झालेल्या या कारवाईत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलिस कर्मचारी, महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले.

एक ताब्यात

या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांची कारवाई सुरु आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर हिमायतनगर, इस्लापूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवणी आणि झळकवाडी ही गावे तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहेत. तर इथे तेलंगणातून गांजा विक्री आणि मागणी होत असते? या कारवाईत महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: धुळेच्या कारवाईत किती गांजा नष्ट करण्यात आला?

    Ans: वनहद्दीत 122 गुंठ्यांवर उगवलेली अंदाजे 2,125 किलो गांजाची झाडे जाळून नष्ट करण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 1.06 कोटी रुपये आहे.

  • Que: नांदेडमध्ये कुठून गांजा जप्त करण्यात आला?

    Ans: किनवट तालुक्यातील शिवणी-झळकवाडी दरम्यान तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली 40–45 किलो गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली आणि पुढील पावलं काय?

    Ans: धडाकेबाज मोहिमेत एक व्यक्ती ताब्यात घेतला असून, आणखी कोण सामील आहे व तेलंगणातून पुरवठा सुरू होता का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Web Title: Dhule crime major operation in dhule and nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.