धुळे: धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन ३ आणि ६ वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27) मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून प्राप्त झाले आहे.
विहिरीत आढळले मृतदेह
विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी होते त्यामुळे घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध घेत असतांना ते कुठेही सापडले नाही. त्यांना संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
का केली आत्महत्या?
प्राथमिक चौकशीत समोर आले की, गायत्री दिवसांपासून मानसिक तणावात होती. कुटुंबातील वाद, मतभेद आणि वाढलं चालेलं नैराश्य या सर्व कारणांमुळे तिने टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोम पंपावर टाकला दरोडा, २२ हजारांची रोकडलं लुटली, घटना CCTV मध्येकैद
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत 22 हजार रुपयांची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सदाशिव पेट्रोलियम पंपावर घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चार संशयित एकाच दुचाकीवर येऊन पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते. पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवळी, सुनील नगराळे व संतोष नगराळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पैश्यांची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर रोकड भरलेली बॅग हिसकावून घेऊन चौघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
Ans: निकुंभे
Ans: दोन
Ans: सोनगीर






