अवैध वाळू माफियांवर नांदेड पोलिसांचा छापा कोट्यवधींचा माल जप्त केला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सर्व पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अर्धापूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना नायब तहसिलदार राजेंद्र शिंदे यांनी मौजे पिंपळगाव पाटी येथील विश्वप्रयाग हटिलच्या मागील बाजूस रेतीने भरलेली वाहने उभी असल्याची माहिती दिली.
सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकला. जप्त वाहनांमध्ये हायवा एमएच २६-सीएच १६२९, एमएच २६ सीएच २८७७,
असता चार वाहने अवैध रेतीसह आढळून आली. एमएच २१ बीएच २६३५ आणि एमएच ४८ जे ०८८५ यांचा समावेश आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याचा फायदा घेऊन वाहनचालक पसार झाले. तरीही पोलिसांनी रेतीसह सर्व वाहने पंचासमक्ष जप्त केली. या कारवाईत एकूण १ कोटी १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. चित्तरंजन डेमकेवाड हे करीत आहेत.
हे देखील वाचा : महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral
अर्धापूर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक रोखत प्रभावी कारवाई केली असल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा बसवण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हे देखील वाचा : विरोधकांचा चहापानवर बहिष्कार! विजय वडेट्टीवारांनी थेट वाचली रखडलेल्या प्रकल्पांची यादी
लिंबगाव पोलिसांकडून वाळू माफियांवर कारवाई
माफियांवर कारवाई अवैध रेती उपशयावन अंकुला ठेवण्यासाठी लिखगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पॉलिसकडून मोठी आणि धडक मोहीम राबविण्यात आली. गांववरी नदीपाचातील बोरगाव तेलग येथे अवैधरित्या वाळू उपसा करणा-यांना जेरबंद केले आहे. बोरगाव तेलंग फाटा नारेश्वर रोड येथे ही कारवाई करण्यात आली. व कारवाईमध्ये सुमारे दहा लाख करा हज्जार पचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंढरीनाथ बोधनकर। सहाय्यक पोलीस निरीक्षक लिबगाव पेलीस स्टेशन) यांनी ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पन एम सय्यद, गर्दनमारे, काही बोधमवाड यांचा सहभाग या प्रकरणात बोरगखाय तेलम येथील चंद्रकांत गमधतराव क्षीरसागर, सुगांव येथील रामदास गुबरे या आरोपीकर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पंलिसांनी एम एच २६, एवं ७९०५ या क्रमांकाचे दहा लाख रुपये किमतीचे टिपर व बारा हजार पाचशे रुपये किमतीची अडीच ब्रास रेती जप्त केली आहे.






