Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

जुना वाद पुन्हा उफाळला आणि भर बाजारपेठेत दोन गट आमनेसामने आले. काही क्षणांतच धारदार शस्त्रे बाहेर आली अन् हवेत चार राऊंड फायर झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 08:56 AM
Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Follow Us
Follow Us:
  • मनोहर चित्रमंदिर परिसरात दोन गट आमनेसामने
  • धारदार शस्त्रांनी हाणामारी; हवेत चार राऊंड फायर
  • सीसीटीव्ही तपासणी; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
 

धुळे : शहरातील गजबजलेल्या जुना आग्रा रोडवरील मनोहर चित्रमंदिर परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या धुमश्चक्रीदरम्यान संशयितांनी हवेत तब्बल चार राऊंड फायरिंग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना आग्रा रोड हा धुळे शहरातील प्रमुख आणि कायम गजबजलेला परिसर आहे. मनोहर चित्रमंदिराजवळ दोन गटांतील तरुण आमनेसामने आले. या दोन्ही गटांमध्ये मागील काही काळापासून जुना वाद सुरू असल्याची माहिती आहे. याच वादातून त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.

हेही वाचा:Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

धारदार शस्त्रे बाहेर काढली

हाणामारीदरम्यान दोन्ही गटांतील काही तरुणांनी धारदार शस्त्रे बाहेर काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भर बाजारपेठेत अचानक सुरू झालेल्या या धुमश्चक्रीमुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचदरम्यान काही संशयितांनी हवेत चार राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक हादरले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांचे पथक तातडीने मनोहर चित्रमंदिर परिसरात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्राथमिक तपासात मागील जुन्या वादातूनच हाणामारी आणि गोळीबाराचा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमागील नेमके कारण आणि सहभागी आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Dhule manohar chitramandir firing old dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • dhule news
  • maharashtra crime cases
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न
1

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
2

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Crime News: आईला फोन करून म्हणाली, ‘माझ्यासोबत मारहाण झाली’; काही वेळातच होमस्टेमध्ये विद्यार्थिनीला पाहताच…
3

Crime News: आईला फोन करून म्हणाली, ‘माझ्यासोबत मारहाण झाली’; काही वेळातच होमस्टेमध्ये विद्यार्थिनीला पाहताच…

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.