Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: धुळे हादरलं! 18 वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; हात हवेत पण CCTV मध्ये ‘कोणी तरी ओढतंय’ असा थरार

धुळेतील सहजीवन नगरातून 18 वर्षीय संजीवनी वराडे दिवसाढवळ्या बेपत्ता झाली. CCTV फुटेजमध्ये ती विचित्र हालचाली करताना दिसते. अपहरण की अन्य कारण, याबाबत संभ्रम असून पोलिस व कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 10:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षीय तरुणी सहजीवन नगरातून अचानक बेपत्ता
  • CCTV मध्ये हात हवेत ठेवून चालताना संशयास्पद हालचाल
  • अपहरण की अन्य कारण? परिसरात भीती, शोधमोहीम सुरू
धुळे: धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असं या तरुणीचे नाव आहे. ती बेपत्ता होतांनाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओत तीचा हात हवेत आहे, मात्र असं वाटत आहे की तिचा हात कोणी तरी ओढतंय. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरात ती शेवटची दिसली. या घटनेने खळबळ उडालीय आहे.

काय घडलं नेमकं?

आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्हीमध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो. तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत असा आहे, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते.

Solapur Crime: ‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?

pic.twitter.com/XmzyK1kWQP — Naresh Shende (@NareshShen87640) April 17, 2026

 

संमोहनाद्वारे केलेले अपहरण

संजीवनीचे कुटुंबिय आणि नातेवाईक आणि पोलीस सर्वत्र तिचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातारावण आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते,हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावाने नेल्याची चर्चा नागरिक करत आहेत. दुसरीकडे, ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी व त्या तंद्रीतच घराबाहेर पडली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने कुटुंबाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती. अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dharashiv Crime: परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणी कोण आहे?

    Ans: संजीवनी राहुल वराडे, वय 18, धुळे येथील रहिवासी.

  • Que: CCTV मध्ये काय दिसले?

    Ans: ती हात हवेत ठेवून चालताना दिसते, जणू कोणीतरी ओढत आहे असे वाटते.

  • Que: सध्या काय कारवाई सुरू आहे?

    Ans: पोलिस तपास सुरू असून कुटुंबीय व नागरिकांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.

Web Title: Dhule shaken 18 year old woman goes missing in broad daylight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
1

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
2

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
3

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
4

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.