Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस…?;अक्षय शिंदेचा शेवटचा व्हिडीओ दाखवत राऊतांचा थेट सवाल

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरसाठी बदलापुरात जल्लोष होत असताना दुसरीकडे अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.” माझा मुलगा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो. जाणीवपूर्वक त्याला मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 24, 2024 | 11:19 AM
कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस…?;अक्षय शिंदेचा शेवटचा व्हिडीओ दाखवत राऊतांचा थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या  अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.  या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या सर्वात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  अक्षय शिंदेचा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. य़ा व्हिडीओत  पोलीस अधिकारी  अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी अक्षयच्या हातात बेड्या होत्या, चेहरा मास्कने पूर्णपणे झाकलेला दिसत आहेत.  हा व्हिडीओ दाखवत त्यांनी , “याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे,” असा आरोप संजय राऊत यांनी केली आहे.

याने पोलिसांवर हल्ला केला?
अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता.
त्यामुळे नक्की काय घडले?
कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत?
महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।
⁦@Dev_Fadnavis⁩ pic.twitter.com/wo2dvqoBBs
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2024

हेही वाचा:  अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?, वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.   पण मुंब्रा बायपासवर नेमकं काय झालं, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अधिकारी अक्षय शिंदेला तळोजा तुरूंगातून  बदलापूर गुन्हे शाखेला घेऊन जात होते.

पोलिसांची कार मुंब्रा बायपासवर पोहचली असता अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकवून त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्यापायाला गोळी लागली. अक्षय पळून जाण्याच्या तयारीत  असताना त्याने इतर पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार कऱण्याचा प्रयत्न केला पण  पोलीस निरीक्ष संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळीबार केला. यात त्याला तीन गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमीही झाला. त्याला उपचारासाठ रुग्णालयात दाखल करण्याता आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा:अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा टाहो; मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय

Web Title: Direct question of sanjay raut while showing the last video of akshay shinde nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
1

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत
2

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी  भाजपवर तोफ डागली
3

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत
4

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.