नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आप आपल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात असलेल्या एका तरुणीच्या भावला कुणकुण लागली. तरुणीचा भाऊ थेट लॉजवर पोहोचला आणि तिला रंगेहाथ पकडले आणि मोठा राडा झाला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडली. राडा करणारा तरुणीचा भाऊ अल्पवयीन असून तो त्याच्या दोन मित्रांसोबत तो तिथे गेला होता. पोलिसांनी या प्रकणी जिवे मारण्याचा प्रयत्न अन् अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणात मोठी अपडेट: २० कोटींची करचोरी उघड; आरोपीला कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा
नेमकं काय घडलं?
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालूक्यातील एका गावात तीन तरुणी महाविद्यालयाच्या (College) तृतीय वर्षात शिकतात. २१ जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या तीन तरुणी आप-आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसा रॉड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लाऊंजवर गेल्याची माहिती मिळाली. त्यांनतर, अल्पवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहचला आणि तिथे मोठा राडा झाला.
भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहाथ पकडले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला, यात तिचा एक हाथ मोडला. दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजमधून बाहेर आणले. त्यानंतर, भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलींकडून अत्याचार केल्याची फिर्याद
दरम्यान, 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर तीन तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यावरुन, पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सखोल तपास सूरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी
डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. तिला धमकी देत प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून संबंधित तरुणाला अटक केली आहे.
परभणीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्वेलर्समध्येच चोरी; तब्बल 20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास