ज्वेलर्समधून २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास (संग्रहित फोटो)
घनसावंगी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. घरफोडी, चोरीच्या घटनाही वाढत आहेत. त्यातच कुंभार पिंपळगाव येथील बसस्टँड रोडवरील ज्ञानेश्वर ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानात बुधवारी (दि.२३) मोठी चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून 20 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
कुंभार पिंपळगाव येथील सोने चांदीच्या दुकानातून ५ तोळे नाकातील सोन्याच्या ३ लाख ७५ हजार रुपयांच्या मोरण्या, २ तोळे १ लाख ५० हजार किंमतीचे सोन्याचे कुडके, ७ ग्रॅम कानातील ५२ हजार ५०० किंमतीचे हुजुर, एक तोळे ७५ हजार किमतीचे कानातील सोन्याचे झुंबर, दोन तोळे १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे गळ्यातील नेकलेस, ६ ग्रॅम ४८ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे वेल, १२ ग्रॅम ९६ हजाराचे सोन्याचे पेंडल, एक तोळा ८० हजाराची सोन्याची मोड याशिवाय मोठा ऐवज चोरून नेला.
हेदेखील वाचा : Shiroli Crime News : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
दरम्यान, याप्रकरणी ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.
चोरीच्या घटनांमध्ये होतीये वाढ
दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापूरच्या शिरोली तालुक्यातून चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. पुलाची शिरोलीत शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व अडीच लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे. मोरे गल्ली व जय शिवराय तालीम मंडळ या दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष दोन्ही चोरीच्या घटना भर वस्तीत घडल्यामुळे ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच