सौजन्य : सोशल मीडिया
नांदेड : राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न होत असून दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदतदेखील सरकारकडून करण्यात आली आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांना त्यांनी थेट इशारा दिला आहे. (Eknath Shinde)
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फायनान्स कंपन्यांना सक्त ताकीद देत ‘शेतकऱ्यांना त्रास देऊ नका नाहीतर तुम्हाला आडवं करू,’ असा इशारा दिला आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण, हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे यांनी नांदेडच्या विकासकामांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा आणि चारा व्यवस्थेच्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा मुद्दा उपस्थित करत शिंदे म्हणाले की, आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकू नये.
‘शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवं करू,’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्याचं सांगत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. या मदतीसाठी सरकारने 7,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यावेळी विरोधकांवर टीका करताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. महिलांना मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ सुरू राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह मेळावे आयोजित करण्याची माहितीही त्यांनी दिली. दिवाळीच्या काळात शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
Ans: शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Ans: पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत दिली जाणार आहे. 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 33 टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
Ans: लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांना दरमहा मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ सुरू राहील, असं त्यांनी सांगितलं.






