Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं

गेल्या वर्षी एका पीडित महिलेने लैंगिक छळाची तक्रार केली होती. पण चाकणकर यांनी तिला मदत करण्याऐवजी खरातचीच पाठराखण केली, असा खळबळजनक आरोप होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 21, 2026 | 12:25 PM
Rohini Khadse, Ashok Kharat Case, Political Criticism, Nashik Crime,

Rohini Khadse, Ashok Kharat Case, Political Criticism, Nashik Crime,

Follow Us
Follow Us:
  • रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
  • चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत ‘ट्विटर वॉर’ सुरू
  • पोलिसांच्या हाती अशोक खरातचे दोन लॅपटॉप आणि १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ
Rohini Khadse on Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यातच खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. या प्रकरणावरून विरोधकांकडून दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द

रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीसोबतच्या संबंधांच्या चर्चांमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे मानले जात आहे. या धक्कादायक प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…”अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी इशारा दिला आहे. तसेच, ‘ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म,’ असेही खडसे म्हणाल्या.

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

दरम्यान, अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

“गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल ! माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…” अशा शब्दांत खडसे यांनी चाकणकरांना इशारा दिला आहे.

Rupali Chakankar Photo : अशोक खरातसोबत व्हिडीओ, फोटो व्हायरल

धक्कादायक बाब म्हणजे, अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात चाकणकर अशोक खरातच्या पायांची पूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओत चाकणकर यांनी खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. त्याशिवाय चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रुपाली चाकणकरांचा खरातच्या ट्रस्टमधील सहभाग

दरम्यान, रुपाली चाकणकर या आरोपी अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी एका पीडित महिलेने लैंगिक छळाची तक्रार केली होती. पण चाकणकर यांनी तिला मदत करण्याऐवजी खरातचीच पाठराखण केली, असा खळबळजनक आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर, खरातवर त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. पण विरोधी पक्षांचा वाढता दबाव आणि व्हायरल फोटोंमुळे अखेर त्यांनी राजीनामा दिला.

पोलिसांच्या हाती १०० हून अधिक व्हिडिओ

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अशोक खरातचे दोन लॅपटॉप आणि १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ लागले आहेत. या पुराव्यांवरून खरातने केलेल्या कृत्यांची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि राजकीय धागेदोरे आता पोलिसांच्या तपासाचे मुख्य केंद्र बनले आहेत.

 

Web Title: Dont fly too high rohini khadse slams rupali chakankar after her resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Nashik Crime
  • rupali chakankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.