
रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मार्च महिन्यात अशोक खरात याचे महिलांची फसवणूक करून लैंगिक छळ केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपींनी रूपाली चाकणकरांबद्दल समाजमाध्यमांवर या पोस्ट केल्या होत्या. त्यावेळी चाकणकरांवर खूप टिका झाली होती. त्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित असून घटनेच्या पाच महिन्यानंतर फिर्यादींनी तक्रार दाखल केली आहे. तसेच तपासाच्या बाबी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असून आपला मोबाईलफोन त्यासाठी पोलिसांना सुपूर्द केला असल्याने तपासासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद भूषण पाटील यांच्या वकिलांनी केला होता. आपण वेळोवेळी हजर राहून पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याचेही त्यांनी युक्तिवादात म्हटले होते.
सरकारपक्ष आणि चाकणकरांच्या वकील जयश्री पालवे यांनी आरोपींनी ऑनलाइन टाकलेल्या मजकुराचे फोटो न्यायालयात सादर केले होते. आरोपींनी हेतुपूर्वक या पोस्ट टाकल्या आहेत तसेच इतरांना त्यावर कमेंट करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे त्यांचे म्हणणे होते. आरोपींनी केलेल्या पोस्ट अत्यंत घाणेरड्या भाषेत बदनामी करणाऱ्या असल्याने न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.
हे सुद्धा वाचा : भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
१९ आरोपींपैकी कोणालाही अटक नाही
याप्रकरणात एकूण १९ आरोपी असून अजून कुणालाही अटक केलेली नाही. संगीता तिवारी, रूपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, मोहसीन शेख, योगेश सावंत, महादेव बालगुडे, अशोक बेद्रे यांच्यासह इतर या प्रकरणात आरोपी असल्याचे रूपाली चाकणकरांच्या वकील जयश्री पालवे यांनी सांगितले.
Ans: सपना नंदकिशोर राऊत, मिलिंद मारुती गोरे आणि भूषण सुरेश पाटील या तिघांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.
Ans: रूपाली चाकणकर यांनी पुणे शहर सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी अश्लील मजकूर प्रसारित करणे, बदनामीकारक पोस्ट करणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ans: या प्रकरणात एकूण १९ आरोपी आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.