crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. हि घटना शनिवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मृतकाचे नाव महादेव त्रबंक चोपडे, (वय 70) वर्ष) व कलावती महादेव चोपडे (वय 65 वर्ष) असे आहे. तर आरोपी मुलाचे नाव गणेश महादेव चोपडे असे आहे.
Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथे मुलानेच आई-वडिलांची निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना काल (२७ सप्टेंबर रोजी) सायंकाळी घडली. आरोपी गणेश महादेव चोपडे (३१) याने स्वतःच्या वडिलांवर महादेव त्र्यंबक चोपडे (७०) व आई कलावतीबाई महादेव चोपडे (६५) यांच्यावर संतापाच्या भरात हल्ला केला. गणेश याने दोघांना बेदम मारहाण केली आहे. त्यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
कोणत्या कारणावरून झाला वाद
मृतक महादेव चोपडे यांना दोन मुले आहेत. आरोपी गणेश हा धाकटा मुलगा असून, दोन्ही मुलांना जमिनीचे हिस्से देण्यात आले होते. मात्र आई कलावतीबाई यांच्या नावे असलेली जमीन विकण्याबाबत घरात वाद सुरु होता. शनिवारी त्यावरून पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात गणेशने आई- वडिलांना मारून ठार केले अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान ही घटना फक्त शेतीच्या वादातून झाली का, की त्यामागे इतर काही कारणे आहेत, हेही तपासात स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हॉटेलमध्ये आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह,आधी प्रेयसीची हत्या नंतर स्वतः संपवलं जीवन
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये तरुण व तरुणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला आले आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे घडली आहे. हॉटेलमध्ये मृतक दुपारपासून थांबलेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव जमला होता. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.