
Dr. Gauri Palve-Garje Case Update:
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची आज न्यायालयात झालेल्या सुनावणी पार पडली. अॅड. मंगेश देशमुख यांना अनंत गर्जे यांच्या बाजूने युक्तिवाद केला. यावेळी लग्नापूर्वीच पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली होती. असा दावा करत मंगेश देशमुख यांनी अनंत गर्जेंच्या पोलीस कोठडीला विरोध केला. गौरीचे वडील अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. पालवे कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांच्या भावंडांवरही आरोप केले आहेत. पण ते फरार असून त्यांच्याही शोध सुरू आहे. ते ताब्यात आल्यानंतर त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत सरकारी वकिलांनी अनंत गर्जेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
पण त्याचवेळी,अनंत गर्जेंचे वकिलांनी त्यांच्या कोठडीला विरोध केला. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात अनंत गर्जेनी डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नाही. गौरी यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय आरोपीने लग्नापूर्वीच त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांना कल्पना दिली होती. असा पुनरुच्चार केला. पण न्यायालयाने अनंत गर्जेला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घराची झडती घेतली. गौरीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, तिच्या मृत्यूमागील कारणे काय असू शकतात आणि त्या वेळी तिच्या आसपास काय घडत होते—याबद्दलचे महत्त्वपूर्ण पुरावे शोधण्याचे काम या पथकाकडून सुरू आहे.