Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला 'तो' व्यक्ती कोण?
अंजली दमानिया म्हणाल्या, सकाळी आठ वाजताच मला फोन आला होता. आम्ही बीडवरून आलो आहोत आणि आम्हाला मदत हवी आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. यानंतर मी लगेच वरळी पोलीस स्टेशनला गेले. तिथे तिचे आई-वडील खूप रडत होते. त्यांच्या जावयानेच त्यांना पहिला फोन केला होता. तुमची मुलगी आत्महत्या करत आहे, तिला समजवा. त्यानंतर पाच मिनिटांनी गौरीच्या आईला फोन करून त्यानेच तिने गळफास घेतल्याचे सांगितले.
ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या गौरीच्या मैत्रिणींशी मी चर्चा केली. तिच्या मैत्रीणींदेखील गौरीच्या चेहऱ्यावर मार्क असायचे, म्हणजेच तिल मारहाण होत होती. हे स्पष्ट होतं. गौरी स्ट्राँग मुलही होती. ती अशी आत्महत्या करू शकत नाही, असं तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, गौरीचा मृत्यू झाल्यापासून अनंत गर्जे कुठे गायब होते. पोलीस वरळी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवत असताना त्याठिकाणी गौरीच्या सासरचा एकही माणूस उपस्थित नव्हता. जर ही आत्महत्या होती,तर त्याने गायब होण्याची कोणतीही गरज नव्हती. वरळी पोलिस स्टेशनला बीडच्या एका माणसाने सांगितले की, ताई एफआयआर दाखल होताना इथे सेटलमेंटच्या गोष्टी होत होत्या, सिनीयर पीआयच्या केबिनमध्ये एक माणूस आला त्याने पोलिसांकडे तुमचा एक माणूस द्या सेटलमेंट करू, असं सांगतिल. अगदी पीआयच्या समोर या सेटलमेंटच्या गोष्टी सुरू होत्या. एका व्यक्तीने या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी सांगितलं आहे. असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला. तसेच, वरळी पोलिस स्टेशनचे सकाळी ६ वाजल्यापासूनचे सीसीटिव्ही फुटेज आम्हाला हवेत, सेटलमेंटसाठी कोणता पीआय भेटायला गेला होते, हे स्पष्ट होईल, असंही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं.
Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक
यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार करण्याचा आग्रही धरला होता. त्यावेळी गर्जे आणि पालवे कुटुंबियांमध्ये जोरदार वादही झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. पण त्यानंतरही गावात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.
गौरीच्या पार्थिवावर अत्यंसस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना शोक अनावर झाला. त्यांनी हंबरडा फोडला. सर्वांदेखत ते धाय मोकलून रडू लागले. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी विनवणी केली. ” तुम्हाला मुली द्यायच्या असतील तर आम्हाला द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंतांच्या भपक्यावर जाऊ नका, त्याच्या नादी लागू नका,” गौरीच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान, सुरुवातीला अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती नसल्याने गौरीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी गर्जेला अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






