crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
धुळे येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात सर्वांसमोर दोन पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलिसांना मारताना एक तरुण दिसत आहे.
chhatrapati Sambhajinagar: महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती,आरोपी अटकेत
नेमकं काय घडलं?
धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक सैंगदाणे हे पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी त्यांनी पोलीस गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. याच वेळी एक गाडी भरधाव वेगात आली. आणि त्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. धडक देणारा आरोपी याचा नाव सोपान पाटील हा गाडी चालवत होता. सोपान हा साडगाव येथील रहिवासी आहे. शिवाय तो मध्यधुंद अवस्थेत होता. त्याच स्थितीत त्याने गाडीला जोरदार धडक दिली.
त्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पोलीस त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोपान पाटील याने कुठलाही विचार न करता सतीश फुलपगारे व दीपक शेंगदाणे या दोघा पोलीस हवालदारांना शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्याने त्या दोघांच्या अंगावरही हात घातला. दोघांच्या ही कानशिलात त्याने लगावली. तिथे असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला.
यावेळी परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस कर्मचारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो काही ही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. तो पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करीत होता. त्यानंतर त्याला पकडून घेवून जाण्यात आले. त्यावेळी त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या सामानाची ही तोडफोड केली. मोठा राडा यावेळी पाहायला मिळाला आहे. त्याच्या विरोधात आता पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.
डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यात डंपरच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास किवळे येथील सई द्वारका हौसिंग सोसायटीसमोर ही भीषण घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव दीपाल बहादूर साई (वय ३२, रा. विकासनगर, देहूरोड) असे असून, ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.