Durgapur case:'
Durgapur case: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे देशात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ओडिशातील बालासोर येथील रहिवासी असलेली पीडिता गेल्या शुक्रवारी रात्री तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेज कॅम्पसबाहेर उभी असताना पाच तरुणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपींनी तिला गप्प राहण्यासाठी पाच हजार रुपये देऊ केले. भीतीमुळे पीडितेने सुरुवातीला मारहाणीची तक्रार केली, परंतु पोलिस तपासादरम्यान सामूहिक बलात्काराचा खुलासा झाला. पण पीडितेवर उचपार करणाऱ्या डॉक्टरांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची अंगावर काटा आणणारी आपबीती सांगितली आहे.
पीडितेने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही त्यांना त्यांची गाडी सोडून आमच्याकडे येताना पाहिले. आम्ही जंगलाकडे पळू लागलो. तीनजण आमचा पाठलाग करू लागले. त्यांनी मला पकडले आणि मला जंगलात ओढत नेले. त्यांनी माझा फोन हिसकावून घेत माझ्या मैत्रिणीला फोन करण्यासाठी भाग पाडले, पण ती आली नही, त्यावेळी त्यांनी मला घनदाट जंगलात ओढत नेले.
“त्यांनी मला मागून पकडले, माझा फोन हिसकावून घेतला आणि माझ्या मैत्रिणीाल फोन करायला सांगितले. जेव्हा ती आली नाही, त्यानंतर त्यांनी त्यांनी मला झोपायला भाग पाडले. मी ओरडले, किंवा मी आवाज केला तर ते आणखी लोकांना बोलावतील आणि तेही माझ्यावर बलात्कार करतील. म्हणून आम्हाला करू दे.”
ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री तिच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसबाहेर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ती तिच्या मैत्रिणीसोबत जेवायला गेली असताना काही पुरूषांनी त्यांच्यावर हल्ला केला. आतापर्यंत अटक केलेल्या पाच जणांपैकी एक माजी महाविद्यालयीन सुरक्षा रक्षक आहे, दुसरा रुग्णालयात काम करतो, दुसरा स्थानिक महानगरपालिका संस्थेत तात्पुरता नोकरी करतो आणि एक बेरोजगार आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्व आरोपींना गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी घटनास्थळी नेले जाईल. हा हल्ला कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या परानागंज काली बारी स्मशानभूमीला लागून असलेल्या जंगलात झाला. पीडितेच्या विधानाची पडताळणी करणे आणि हल्ल्यापूर्वीच्या घटनांचा क्रम स्पष्ट करणे हा, गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्याचामागचा उद्देश आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत काही दिवसांपूर्वी विद्यार्थी मुलींनी रात्री उशिरा बाहेर जाऊ नये, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या वडिलांनी बंगालमधील परिस्थितीची तुलना “औरंगजेबाच्या राजवटीशी” केली आहे. तर राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी “दुसरे पुनर्जागरण” करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “त्या (ममता बॅनर्जी) स्वतः एक महिला आहेत. मग अशा बेजबाबदार गोष्टी कशा बोलू शकतात? महिलांनी नोकरी सोडून घरीच राहावे का? असं वाटतंय, जणू बंगाल औरंगजेबाच्या राजवटीत आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.