Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा…

लखनऊच्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दिल्लीत तिचा अश्लील व्हिडिओद्वारे छळ करण्यात आला. धर्मांतर आणि निकाहसाठी दबाव टाकणाऱ्या नफीस खानविरुद्ध अखेर गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 07:18 PM
दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा... (Photo Credit - X)

दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा... (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

  • दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले
  • मग सुरू झाला धर्मांतराचा…
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे अश्लील व्हिडिओ बनवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी नफीस खान याने पीडितेवर निकाह करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाचे नाटक करून दिल्लीला पलायन

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या जानकीपुरम परिसरात राहणाऱ्या एका हिंदू तरुणीची ओळख त्याच भागात राहणाऱ्या नफीस खान याच्याशी झाली होती. नफीसने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि गेल्या महिन्यात तो तिला फसवून दिल्लीला घेऊन गेला. मात्र, दिल्लीत पोहोचल्यानंतर नफीसचे खरे स्वरूप समोर आले. त्याने तरुणीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि निकाह करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचा थरार

पीडित तरुणीने धर्मांतरास विरोध दर्शवल्यानंतर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, तिचे काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला घरातच कैद करून ठेवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पीडितेने कसाबसा आपला जीव वाचवून तेथून पळ काढला आणि कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी तातडीने दिल्ली गाठून तिला लखनऊला सुखरूप परत आणले.

Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?

पोलीस प्रशासनाची टाळाटाळ आणि जनक्षोभ

२१ फेब्रुवारी रोजी पीडित कुटुंबाने जानकीपुरम पोलीस ठाण्यात नफीस खानविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, आरोप आहे की पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेऊन ठेवला आणि कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे, आरोपीकडून पीडितेला सतत धमक्या येत होत्या. पोलिसांच्या या ढिम्म कारभारामुळे संतप्त झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर धडक दिली. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास

वाढता तणाव पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी नफीस खानविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. जानकीपुरम पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद तिवारी यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची तपासणी केली जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.”

मुंबईत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ; डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी अधिकारी टार्गेट

Web Title: Hindu girl taken to delhi and trapped in pornographic video game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • crime news
  • Hindu
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.