Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; टोळीतील दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार

Crime News : नरसापुर एक्स्प्रेस गाडीवर पिंगळी रेल्वे स्टेशनवर रविवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा डाव उलटला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 06:08 PM
Police foil robbery attempt on Narasapur Express Nanded News

Police foil robbery attempt on Narasapur Express Nanded News

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Crime News : पूर्णा : नरसापुरहुन नगरसोलकडे जाणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेस गाडीवर पिंगळी रेल्वे स्टेशनवर रविवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा (Crime News) रेल्वे पोलिसांनी प्रयत्न हाणून पाडला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली. तर इतर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अटक केलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पिंगळी रेल्वे स्थानकावर आरोपी दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसले होते. (Nanded News)

पिंगळी रेल्वे स्टेशनवरची घटना; दोन दिवस कोठडी

पोलिसांनी दोन दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.  यावेळी आरोपी सखाराम किशनराव पवार (वय ५० रा. कमलापुर), गोपाल सखाराम पवार (वय २० रा. कमलापुर) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून लोखंडी कत्ती, लोखंडी सुरी, भाला, मोबाईल, दोन मोटार सायकल असे प्राणघातक शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या आरोपींमध्ये अविनाश श्रीराम काळे उर्फ ड्रिम (रा.फुलेवाडी सौताडा ता. पाटोदा जि. बीड) असे असून इतर दुसऱ्याचे नाव निष्पन्न झाले नाही असे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

दरम्यान, रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले तर इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून काही साहित्य जप्त केले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दोन्ही आरोपीना नांदेडच्या न्यायालयात रविवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सपोनि शैलेश जोगदंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नेगि, जमादार राम कातकडे, पोलीस शिपाई सखाराम पवार, राहुल दाभाडे, संजय भेडेकर, प्रविण कांबळे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अमोल वावळे, काशीटवार, चव्हाण, रणचौरसिंग यादव यांनी यशस्वी केली आहे.


हे देखील वाचा :
N फॉर North Korea, N फॉर नरक? इतके कडक निर्बंध, देशात जगणे जणू मरण्यासारखे

 

 

Web Title: Police foil robbery attempt on narasapur express nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Police
  • nanded news

संबंधित बातम्या

Crime News: दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा…
1

Crime News: दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा…

विभागीय आयुक्तालयाच्या प्रक्रियेला वेग; नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती
2

विभागीय आयुक्तालयाच्या प्रक्रियेला वेग; नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती

Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?
3

Navi Mumbai News : राख चोरीचा धक्कादायक प्रकार; स्मशानभूमीत घडतायत अघोरी कृत्य ? नवी मुंबईत चाललंय तरी काय ?

माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर
4

माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.