Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

टिटवाळा येथून जुन्नरला जाण्यासाठी उबेर कार बुक करून मध्ये बसल्यानंतर चालकाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 03:33 PM
माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

Follow Us
Follow Us:

​ओतूर/मनोहर हिंगणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टिटवाळा येथून जुन्नरला जाण्यासाठी उबेर कार बुक करून मध्ये बसल्यानंतर चालकाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. टिटवाळा, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या घटनेत नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी (वय २६, रा. ऐरोली, नवी मुंबई) या चालकाचा मृत्यू झाला आहे.

 

​दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आरोपी आदर्श भालेराव याने टिटवाळा येथून जुन्नरला जाण्यासाठी नासीर अन्सारी यांची ‘इर्टिगा’ कार (क्र. MH 03 DV 6403) उबेर ॲपद्वारे बुक केली होती. माळशेज घाटमार्गे प्रवास करत असताना सितेवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीतील गणेशखिंड घाटात ही घटना घडली आहे. नासीर अन्सारी बेपत्ता झाल्याने त्यांच्या भावाने ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ७ मार्च रोजी गणेशखिंड घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उबेर कंपनीकडून मिळालेली माहिती आणि कारचे जीपीएस लोकेशन तपासले असता, कार जुन्नरला न जाता पुन्हा टिटवाळ्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आदर्श भालेराव याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

​आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, गणेशखिंड घाटात लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता चालक नासीर आणि आरोपी यांच्यात पैशांवरून वाद झाला. चालकाने चाकूने धमकावल्याचा दावा आरोपीने केला आहे. या झटापटीत आरोपीने नासीरच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर खोलवर वार केले. नासीरचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह सिमेंटच्या कठड्यावरून खाली फेकून दिला आणि कार घेऊन पुन्हा टिटवाळ्याच्या दिशेने पसार झाला. ही कार त्याने टिटवाळा-गोवेली दरम्यान सोडून दिली होती.

दरम्यान ​पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी लहू थाटे, पीएसआय संदीप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, नामदेव बांबळे, बाळशिराम भवारी, देविदाव खेडकर, भरत सुर्यवंशी, आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान न्यायालयाने आरोपीला १२ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: An uber driver was brutally murdered by a passenger at malshej ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.