Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक

Maval Crime News : मावळमध्ये निवडणूक विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पकडण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2026 | 01:42 PM
Election Department seizes country liquor worth seven lakhs in blockade one arrested in Maval

Election Department seizes country liquor worth seven lakhs in blockade one arrested in Maval

Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News : वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यात (Pune News) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. मावळमध्ये निवडणूक विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पकडण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २९ जानेवारी) मावळ तालुक्यातील (Maval Crime News) नवलाख उंब्रे येथे ही कारवाई केली. या प्रकरणी अंतु रामदास शेटे (वय ४०, रा. नवलाख उंब्रे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेले अजिंक्य सुनील म्हेत्रे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून वाहनासह सुमारे ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा साठा विक्रीच्या उद्देशाने आणण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. निवडणूक काळात बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

हे देखील वाचा : पुणे जिल्ह्यात निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उतारे, जादूटोणा, करणीच्या अफवांनी ग्रामीण मतदार भयग्रस्त

कारवाईदरम्यान निवडणूक विभागाच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान संशयास्पद हालचाल आढळल्याने संबंधित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. संबंधिताकडे कोणताही परवाना अथवा वाहतूक परवानगी नसल्याने तात्काळ कारवाई करण्यात आली.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अवैध दारूचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मावळ तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहन तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या दारूचा साठा कुठून आणण्यात आला आणि कुठे वितरित करण्याचा उद्देश होता, याचा तपास सुरू असून, यामागे कोणतेही मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.

मावळमध्ये निवडणुकीची रणधुमाळी
जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांसाठी सुरुवातीला एकूण १०४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत ७७ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. सध्याच्या स्थितीत मावळ तालुक्यात फक्त तीन अपक्ष उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बहुतेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्येच थेट लढती होत असून, कुसगाव बुद्रुक–काले गटात मात्र चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गटाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक असल्याने या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र काही ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाकडून उमेदवार देण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मतविभाजन होण्याची शक्यता असून, त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Election department seizes country liquor worth seven lakhs in blockade one arrested in maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • pune crime news

संबंधित बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य
1

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा
2

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार
3

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.