अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही एनसीपी पक्ष विलीनिकरणाची चर्चा आमदार सुनील शेळके सूचक वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
विलीनीकरणाची प्रक्रिया थांबलेली नाही – आमदार शेळके
आमदार सुनील शेळके यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले की, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विलीनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ती होणारच आहे. आम्ही सर्वजण या प्रक्रियेबाबत सकारात्मक आहोत,” असे विधान आमदार सुनील शेळके यांनी केले. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची एकजूट राखण्यासाठी विलीनीकरण हाच योग्य पर्याय असल्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळत आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम
वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेत तफावत
एकीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी “अशी कोणतीही चर्चा झालेली नाही” असे म्हणत विलीनीकरणाचे वृत्त फेटाळले आहे, तर दुसरीकडे आमदार सुनील शेळके यांनी मात्र विलीनीकरण होणारच असा दावा केला आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शेळके हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जात असल्याने त्यांच्या विधानाला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व दिले जात आहे.
हे देखील वाचा : “…तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं, हा संधीसाधू माणूसच; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र
राजकीय पुनर्गठनाचे संकेत
विलीनीकरणाच्या या शक्यतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. शेळके यांच्या विधानामुळे आता शरद पवार गटाची अधिकृत भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाबाबतची चर्चा बंद झालेली नाही. या प्रक्रियेकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत आणि येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसून येतील,” असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.






