
Payal Jhambre Update: पतीनंतर आता सासू-सासरेही पोलिसांच्या ताब्यात; मुकुंदनगरमधील पायल झांबरे प्रकरणातील सर्वात मोठे अपडेट!
या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्य आरोपी असलेला पती अक्षय झांबरेला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेले सासू-सासरे पोलिसांना गुंगारा देत होते, परंतु स्वारगेट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांनाही अखेर आपल्या ताब्यात घेतले.
हुंडाबळी आणि सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून १ नोव्हेंबर रोजी २९ वर्षीय विवाहित तरुणी पायल झांबरे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी पायलने आपल्या भावाला “माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे,” असा स्पष्ट मेसेज पाठवला होता. या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलच्या लग्नात माहेरच्या मंडळींनी तब्बल ७० ते ८० लाख रुपये खर्च केले होते. मात्र, तरीही सासरच्या लोकांचे समाधान झाले नव्हते. लग्नानंतर पायलकडे वारंवार सोने आणि पैशांची मागणी केली जात होती. विशेषतः दिवाळीच्या सणात १० तोळे सोनं माहेरवरून आणण्यासाठी तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला जात होता. याच नकोशा झालेल्या त्रासाला आणि सततच्या टॉर्चरला कंटाळून पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आता सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास केला जात आहे.
Ans: पोलिसांनी या प्रकरणात फरार असलेले पायलचे सासरा अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना अटक केली आहे
Ans: मृत्यूपूर्वी पायलने आपल्या भावाला मेसेज पाठवून "माझी सासू या सगळ्याला जबाबदार आहे," असे म्हटले होते.
Ans: लग्नात ७० ते ८० लाख रुपये खर्च करूनही सासरच्या लोकांची हुंड्याची हाव भागली नव्हती; शिवाय दिवाळीत १० तोळे सोन्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता.