Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Chitale Bandhu Scam ‘चितळे बंधू मिठाईवाले’ नावाचा गैरवापर! बनावट बाकरवडीची विक्री करुन केली फसवणूक

पुणेकरांच्या पसंतीची प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून बाकरवडीचे उत्पादन करून ती ऑनलाईन आणि ऑफलाईनरित्या विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2025 | 01:13 PM
Chitale Bhakarwadi, Chitale Bhakarwadi Scam

Chitale Bhakarwadi, Chitale Bhakarwadi Scam

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या पसंतीची प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून बाकरवडीचे उत्पादन करून ती ऑनलाईन आणि ऑफलाईनरित्या विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीच्या आरोपावरून सदाशिव पेठेतील प्रसिद्ध चितळे स्वीट होमच्या मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध बाकरवडीच्या उत्पादनावरून वाद-विवाद झाल्यानंतर दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड खळबळ देखील उडाली आहे..

याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात चितळे स्वीट होमचे प्रो.पा. प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३५० व आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे.

असा प्रकार उघडकीस…

चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे ठरलेल्या काही ग्राहकांकडून बाकरवडीची चव बदलली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे तक्रारदारांनी बाजारातील काही पाकिटे विकत घेऊन त्याची पाहणी केली. तेव्हा चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून तयार होणाऱ्या पाकिटात व या पाकिटात तफावत आढळून आली. त्याची चव, पाकिट व तयार होणाऱ्या सर्व गोष्टींची प्रमुख कारखान्यात तपासणी केली. त्यासोबतच या पाकिटावर मराठीत ‘चितळे स्वीट होम’ तसेच पुणेरी स्पेशल बाकरवडी असे देखील असल्याचे दिसून आले. तेव्हा तक्रारदारांना त्यांच्या नावाने बाकरवडी विक्री केली जात असल्याचे लक्षात आले. यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.

वर्षभरापासून विक्री

चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी असल्याचे भासवून गेल्या एक वर्षांपासून बाजारात ऑफलाईन व ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आता पुणे पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमुळे पुणेकरांमध्ये देखील प्रचंड खळबळ उडाली असून, अधिकृत बाकरवडीच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Fake bakarwadi sold in pune in the name of chitale brothers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • crime
  • pune news
  • scam

संबंधित बातम्या

Pune News : भीषण अपघातानंतर अग्नितांडव; ९ जणांचा होरपळून मृत्यू
1

Pune News : भीषण अपघातानंतर अग्नितांडव; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Pune News: हिंदीसक्तीला पुणेकरांचा कडाडून विरोध; त्रिभाषा सहाव्या वर्गापासून…
2

Pune News: हिंदीसक्तीला पुणेकरांचा कडाडून विरोध; त्रिभाषा सहाव्या वर्गापासून…

Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू
3

Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या
4

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.