Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

काही महत्त्वाच्या ‘सायबर सेफ टिप्स’ शेअर करताना सांगितले की, फसवे लोक विश्वासार्ह ब्रँड्सची नावे गैरवापरून उमेदवारांना भुलवतात आणि अर्ज, प्रशिक्षण, व्हिसा प्रक्रिया किंवा मुलाखतीच्या नावाखाली पैसे उकळतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2025 | 06:30 PM
फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • भरती योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन
  • फेक नोकरी ऑफर ओळखण्याचे संकेत
  • नोकरी मिळवण्यासाठी कधीही पैसे देऊ नका

मुंबई : नोकरीच्या वाढत्या स्पर्धेत उमेदवारांना फसवणूक करणाऱ्या भरती योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन फेडएक्सने केले आहे. कंपनीने नोकरी शोधणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या ‘सायबर सेफ टिप्स’ शेअर करताना सांगितले की, फसवे लोक विश्वासार्ह ब्रँड्सची नावे गैरवापरून उमेदवारांना भुलवतात आणि अर्ज, प्रशिक्षण, व्हिसा प्रक्रिया किंवा मुलाखतीच्या नावाखाली पैसे उकळतात.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलने “ऑनलाईन जॉब फ्रॉड” या गुन्ह्याला अधिकृत श्रेणीत समाविष्ट केले असून, त्यावरून या समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते. अलीकडच्या काळात सरकारने परदेशातील बनावट भरती नेटवर्कविरुद्ध कारवाई करत अनेक भारतीय नागरिकांना वाचवले आहे. हे प्रकार या फसवणुकीचे धोके अधोरेखित करतात.

शिक्षणाच्या मंदिरात राडा! ‘या’ शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्…; चिपळूणमधील धक्कादायक घटना

फेक नोकरी ऑफर ओळखण्याचे संकेत

फेडएक्सने सांगितले की, खोट्या नोकरीच्या ऑफर अनेकदा अत्यंत आकर्षक आश्वासनांसह समोर येतात. साध्या किंवा पार्ट-टाईम कामासाठी अत्यंत जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणे, ही अशा ऑफरची पहिली खूण असते. काही फसवे लोक नोकरी अर्ज, प्रशिक्षण किंवा मुलाखतीसाठी तातडीने पैसे भरण्याची मागणी करतात. तसेच, नामांकित कंपन्यांच्या एचआरच्या नावाने अनाहूतपणे येणारे कॉल, ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश हेही संशयास्पद असतात.

अनेकदा अशा संदेशांमध्ये इतरांना भरती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे रेफरल योजनांचे आमिष दाखवले जाते. त्याचबरोबर, अधिकृत कंपनीच्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट साइट्स, जसे की, fedx.com किंवा fed-ex.com वापरून फसवणूक केली जाते. अशा ईमेल किंवा संदेशांमध्ये चुकीचे शब्दलेखन, व्याकरणातील त्रुटी आणि अतिरेकी उद्गारचिन्हांचा वापर असतो, ज्यावरून त्यांची विश्वसनीयता सहज ओळखता येते.

खोट्या नोकरी ऑफरपासून कसे वाचाल ?

अनोळखी स्रोतांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफरबाबत नेहमीच सतर्क रहा. प्रक्रिया खूपच सोपी किंवा सहज वाटत असल्यास ती फसवणुकीची असण्याची शक्यता असते. नोकरी मिळवण्यासाठी कधीही पैसे देऊ नका, कारण खऱ्या कंपन्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत.

सर्व नोकरीच्या जाहिराती थेट अधिकृत स्त्रोतांवरूनच तपासा. उदाहरणार्थ, फेडएक्सच्या संधींबाबत खात्री करण्यासाठी अधिकृत FedEx Careers पृष्ठ किंवा कंपनीची अधिकृत सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. ईमेल पत्त्यांमधील लहान-सहान स्पेलिंग बदल किंवा अतिरिक्त शब्द हे फसवणुकीचे स्पष्ट संकेत असू शकतात, त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्या.

तसेच, अप्रमाणित प्लॅटफॉर्मवर किंवा अनोळखी भरती एजंटांना वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देणे टाळा. परदेशातील नोकरीच्या संधींसाठी नियोक्ता आणि भरती एजंटची विश्वसनीयता संबंधित भारतीय दूतावासामार्फत पडताळून पहा. अशा काळजीपूर्वक पावलांमुळे आपण खोट्या नोकरीच्या ऑफरपासून सुरक्षित राहू शकता.

पुण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय ?

संशय आल्यास काय कराल

फेडएक्सने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या भरती फसवणुकीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते; त्या लोकांच्या विश्वासाचा आणि निष्काळजीपणाचा फायदा घेतात. त्यामुळे उमेदवारांनी सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर तुम्हाला एखादी नोकरीची ऑफर संशयास्पद वाटत असेल किंवा फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान झाले असेल, तर त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती, अद्ययावत सूचना आणि सुरक्षिततेसाठीच्या टिप्स मिळवण्यासाठी नागरिकांना @CyberDost या भारत सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Fake job offers on the rise fedex warns job seekers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • FedEx
  • india
  • Job

संबंधित बातम्या

India आणि Russia एकत्र बनवणार ‘सिव्हिल जेट SJ-100’; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार, ‘आत्मनिर्भर भारत’कडे मोठं पाऊल
1

India आणि Russia एकत्र बनवणार ‘सिव्हिल जेट SJ-100’; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार, ‘आत्मनिर्भर भारत’कडे मोठं पाऊल

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली
2

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न
3

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ
4

टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.