मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये पैशांवरून राडा (फोटो- istockphoto )
चेअरमन मंदार शिंदेंना शिवीगाळ
धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा
कामाच्या बिलाच्या पैशांवरून झाला वाद
चिपळूण: कामाच्या बिलाच्या पैशांवरून एका व्यक्तीने थेट शैक्षणिक संस्थेत घुसून चेअरमनलाच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पैशांची मागणी करत आरोपीने चेअरमनच्या अंगावर धाव घेत, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोघांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी, मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे (५२, रा. कोळकेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतिश बाळकृष्ण शिंदे (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदार एज्युकेशनच्या आवारात घडली घटना
ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या आवारात घडली. सतिश शिंदे याला त्याच्या रंगकामाच्या व सिव्हील कामाच्या बिलाचे पैसे फिर्यादी मंदार शिंद यांच्याकडून घ्यायचे होते, असे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादींनी त्यांना समजावण्याचा केला प्रयत्न
यासाठी फिर्यादीनी सतीश शिंदे यांना २५ ऑक्टोबर रोजी बोलावले होते, मात्र त्यावेळी ते आले नाही. दि. २० ऑक्टोबर रोजी सतीश शिंदे यांना बोलावले नसतानाही ते थेट संस्थेच्या आवारात आले आणि मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले, आवाज ऐकून चेअरमन मंदार शिंदे हे त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यावेळी सतीश शिंदे त्यांना माझ्या कामाच्या बिलाचे पैसे कधी देणार?” अशी विचारणा करत आरडाओरड सुरुच्च ठेवली, फियर्यादीनी त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला २० तारखेला बोलावले होते तेव्हा तुम्ही आला नाहीचा आज तुम्हाला बोलावले नसतानाही तुम्ही आला आहात. तुम्ही आता १२ नोव्हेंबर रोजी या अस फिर्यादी मंदार शिंदे यांनी आरोपीला सांगितले.
आरोपीने केली मारहाण आणि शिवीगाळ
फिर्यादीचे हे बोलणे ऐकताच सतिश शिंदे याचा राग अनावर झाला. त्याने मंदार शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि “तुम्हाला मारतो अशी धमकी देत ती त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. हा गभीर प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेले अवधूत पाटील आणि विजू केळास्कर हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, संतापलेल्या आरोपीने त्या दोघांनाही हाताने धक्काबुक्की केली.






