Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोतया पोलिसाने गाडी अडवून दागिने केले लंपास; कुठे घडली घटना?

पोलीस असल्याचे बतावणी करत एका मोटार सायकलस्वाराला अडवून तपासणीच्या नावाखाली सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम सोन्यावर तोतया पोलीसाने हात साफ केला. ही घटना २८ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबाड (ता. माढा) येथील पेट्रोलपंपाजवळ घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2024 | 11:32 AM
तोतया पोलिसाने गाडी अडवून दागिने केले लंपास; कुठे घडली घटना?

तोतया पोलिसाने गाडी अडवून दागिने केले लंपास; कुठे घडली घटना?

Follow Us
Follow Us:

कुर्डुवाडी : पोलीस असल्याचे बतावणी करत एका मोटार सायकलस्वाराला अडवून तपासणीच्या नावाखाली सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम सोन्यावर तोतया पोलीसाने हात साफ केला. ही घटना २८ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबाड (ता. माढा) येथील पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. याबाबत सुरेश मुरलीधर पाटील (वय-६९, रा.पिंपळनेर ता. माढा) यांनी अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश पाटील हे पिंपळनेर येथील घरातून २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मोटरसायकलवर भुताष्टे (ता. माढा) येथे चुलत मामा वारल्याने सावडण्याकरीता गेले होते. त्यानंतर सावडुन परत गावी जात असताना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अंबाड येथील पेट्रोलपंपाजवळ पोहचले असता एक अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाची युनिकॉर्न सारखी मोटरसायकल घेऊन फिर्यादी जवळ आला व मोटरसायकल थांबविण्यास सांगितली.

फिर्यादी थांबल्यानंतर अंगावर काळे रंगाचे जॅकेट व डोक्याला हेलमेट घातलेल्या अज्ञात इसमाने रात्री चोरी झाली आहे, मी पोलीस आहे, मला तुमची झडती घ्यायची आहे असे सांगितले. त्यामुळे तुमच्या जवळील पैसे व दागिने काढुन रुमालात ठेवा असे सांगितल्याने फिर्यादीने खिश्यातील रुमाल काढुन त्यामध्ये पाकीट, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन त्यामध्ये ठेवली. त्यावेळी त्याने रुमालास गाठ मारुन रुमाल हातात दिला व त्याने रुमाल घरी गेल्यानंतर उघडा असे सांगून तेथुन तो मोटर सायकलवरुन कुर्डुवाडीच्या दिशेने निघुन गेला.

त्यानंतर फिर्यादी घरी पोहोचल्यानंतर जवळील रुमाल उघडल्यानंतर त्यामध्ये सोन्याच्या वस्तू दिसल्या नाहीत फक्त पॉकेट दिसले. यावरून सोन्याची अंगठी व चैन आणि हातचलाखीने लंपास केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यात फिर्यादीची १० ग्रॅम सुमारे ३० हजार रुपयांची एक सोन्याची चैन,२० ग्रॅम दोन पिवळ्या सोन्याच्या अंगठ्या सुमारे ६० हजार रुपयांच्या अशे एकूण ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन गोरे करीत आहेत.

Web Title: Fake police stopped the bike and stole the jewellery nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • crime news
  • Fake Police
  • maharashtra

संबंधित बातम्या

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…
1

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…
2

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

Police Recruitment Scam: “माझा मृत्यू झाला तर…” ऑडिओत थरारक दावा; पोलिसांमधील बोगसगिरी उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद अंत
3

Police Recruitment Scam: “माझा मृत्यू झाला तर…” ऑडिओत थरारक दावा; पोलिसांमधील बोगसगिरी उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद अंत

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!
4

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.