
Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्...
आरोपी इंदू शेखर हा कॅब ड्रायव्हर असून त्याचे सुनिता नावाच्या महिलेशी सुमारे २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुनिताचे तिच्या माहेरच्या मंडळींशी सतत संपर्क असणे आणि कौटुंबिक बाबींमध्ये सासरच्या लोकांचा हस्तक्षेप असल्याचा संशय इंदू शेखरला होता. याच रागातून आणि संशयातून त्याने संपूर्ण सासरचा खात्मा करण्याचा कट रचला. आरोपीने राजाजीनगर येथील भाष्यम सर्कलजवळील घरात या हत्या केल्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरपासून त्याने एकामागोमाग एक हत्या करण्यास सुरुवात केली. आरोपी वेगवेगळ्या कारणांनी सासरच्या सदस्यांना घरात बोलवायचा आणि त्यांच्यावर वरवंट्याने वार करून त्यांची हत्या करायचा. एका प्रकरणात त्याने मेहुणा शिवकुमारला दारू पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि संपवले.
या भीषण नरसंहारात आरोपीने आपली सासू रूपावती, पत्नी सुनिता, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, सुना दिव्या आणि नलिनी, तसेच अवघ्या ७ वर्षांचा नातू पुनीत अशा तब्बल ७ जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या कारमधून सर्व मृतदेह चिकबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स आणि आसपासच्या वेगवेगळ्या भागात नेऊन फेकून दिले.
पत्नीची हत्या केल्यानंतर, ती मैत्रिणीसोबत फिरायला गेली असल्याचे सांगून आरोपीने शेजारी आणि मित्रांची दिशाभूल केली. संशय येऊ नये म्हणून त्याने पत्नीचा मोबाईलही बंद ठेवला होता. मात्र, ३ नोव्हेंबर रोजी मृत महिला दिव्या आणि नलिनी यांच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत इंदू शेखरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सर्व ७ हत्यांची कबुली दिली. हे प्रकरण राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने आरोपीला पुढील तपासासाठी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Ans: कर्नाटकातील बेंगळुरू येथील राजाजीनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
Ans: आरोपीने पत्नीसह सासरच्या ७ जणांची हत्या केली आणि मृतदेह चिकबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स व परिसरामध्ये नेऊन फेकून दिले.
Ans: बेपत्ता महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीदरम्यान आरोपी इंदू शेखर याने ७ हत्या केल्याची कबुली दिली.