
लहान मुलं घरात असली की ती दंगामस्ती करतात. ते काही ना काही खोड्या काढताच राहतात. त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांचाही जीव मेटाकुटीला येतो. मात्र, अशावेळी पालक मुलांना रागवतात, त्यांना समजवतात. मात्र, सोलापुरातील एका निर्दयी पित्यानं त्याचा मुलगा खोड्या काढतो म्हणून त्याचा जीवच घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. मुलाच्या खोडकरापणाला कंटाळून रागाच्या भरात मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारल्याची स्वत: (Father Killed Son) कबुली पित्याने दिली आहे. विजय सिद्राम बट्टू असे आरोपी पित्याचं नाव आहे.
गेल्या 13 जानेवारीला विशाल विजय बट्टू हा 14 वर्षाचा मुलगा बेपतत्ता तक्रार आई, वडीलांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका (Tuljapur Naka) परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले.