Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा ‘आदर्श’ कारभार; ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची स्वीकारली लाच

लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये इतर खाजगी व्यक्ती मिटकरी यांनी तक्रारदार यांना हस्तांतरण पावतीवर सरपंच यांची सही व शिक्का देण्याकरिता २५ हजार रुपये लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 09:27 AM
ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची लाचखोरी; आदर्श गावच्या महिला सरपंचाने घेतली लाच

ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची लाचखोरी; आदर्श गावच्या महिला सरपंचाने घेतली लाच

Follow Us
Follow Us:

वाशिम : जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ख्याती असलेल्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास 25 हजारांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शिरपूर पोलिसात सरपंच सुनीता मिटकरी तसेच सरपंच पती दत्तात्रेय उर्फ बबन मिटकरी यांच्याविरोधात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीने एका प्रकरणात २५ हजारांची लाच मांगितली. तक्रारदाराला ग्राम ढोरखेडा येथे नाली बांधकामाचे काम मिळाले होते. सदर बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करण्यात आले. बांधकामाचे मंजूर झालेल्या बिलाचे हस्तांतरण पावतीवर सरपंचाची स्वाक्षरी व शिक्का देण्याकरिता खाजगी व्यक्ती सरपंच यांचे पती दत्तात्रेय उर्फ बबन मिटकरी यांनी तक्रारदारांना पैशांची मागणी केली. त्यांनी मंजूर रकमेच्या १० टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालय येथे प्राप्त झाली.

घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई

दरम्यान, तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये इतर खाजगी व्यक्ती मिटकरी यांनी तक्रारदार यांना हस्तांतरण पावतीवर सरपंच यांची सही व शिक्का देण्याकरिता २५ हजार रुपये लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तसेच सरपंचांनी देखील त्यांचे लाच मागणीस सहमती दर्शवली.

याबाबत वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रचण्यात आलेल्या सापळ्यात खाजगी व्यक्ती व सरपंच यांच्याविरुद्ध गुरुवारी सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये मिटकरी यांनी लाच मागणी केल्याप्रमाणे सरपंचांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. त्याचप्रमाणे आरोपीचे ताब्यातून रक्कम २५ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले.

राज्यभरात आदर्श सरपंच म्हणून होती ख्याती

ढोरखेडा ग्रामपंचायतीला गेल्या दहा ते बारा वर्षात आदर्श ग्रामपंचायत शासनाचे सुमारे डझनावर पुरस्कार मिळाले आहेत. परिणामी, वाशिम जिल्ह्यातच नव्हे राज्यभरात एक आदर्श सरपंच म्हणून या गावाचा नावलौकिक होता. विशेष म्हणजे यावेळीही तालुका पातळीवर प्रथम आल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी करणारे पथकसुद्धा या कार्यवाहीवेळी ढोरखेडा येथेच उपस्थित होते. गावापासून ते राज्यभरापर्यंत नावाजलेल्या ग्रामपंचायतमध्येसुद्धा भ्रष्टाचाराचा प्रकार घडू शकतो. हे ऐकताच अनेकांना धक्का बसला असून, जिल्हाभरात खळबळ उडाली.

Web Title: Female sarpanch arrested while accepting a bribe of 25000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Bribe Case
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : भादोला वन बीटमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन! २ ट्रॅक्टर, १ जेसीबी जप्त; वनविभागाची कारवाई
1

Buldhana News : भादोला वन बीटमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन! २ ट्रॅक्टर, १ जेसीबी जप्त; वनविभागाची कारवाई

Buldhana News : उपवर्गीकरणाविरोधात एकवटला समाज! ५८ जातींच्या प्रतिनिधींचा सहभाग; जिल्हा कचेरीसमोर आंदोलन
2

Buldhana News : उपवर्गीकरणाविरोधात एकवटला समाज! ५८ जातींच्या प्रतिनिधींचा सहभाग; जिल्हा कचेरीसमोर आंदोलन

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी
3

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी

Buldhana News : मृग नक्षत्र तोंडावर; पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
4

Buldhana News : मृग नक्षत्र तोंडावर; पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.