crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
देशातून पत्नीने पतीला मारले, पतीने पत्नीला संपवले अश्या अनेक घटना समोर येत आहे. आता पुन्हा एक अशीच घटना कर्नाटकातून समोर येत आहे. एका महिलेने तिच्या पतीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसंच हत्येनंतर तिच्या पतीचा मृतदेह घरापासून ३० किमी अंतरावर फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कर्नाटकातील तिप्तूर तालुक्यातील कडाशेट्टीहळ्ळी गावात घडली आहे. शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.शंकरमूर्तीच्या पत्नीने त्याच्या डोळ्यात आधी मिरची पूड टाकली. त्याच्या मानेवर पाय ठेवला आणि मारहाण करत पतीची हत्या केली.
नाशिक हादरलं! डोक्यात कोयत्याने वार करून एकाची हत्या; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं?
शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. त्याच्या आरोपी पत्नीचा नाव सुमंगला असं आहे. शंकरमूर्ती हा त्याच्या शेतात असलेल्या घरात एका राहत होता. त्याची पत्नी सुमंगला ही तिपतूर या ठिकाणी असलेल्या एका वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करत होती. त्या ठिकाणी तिची ओळख नागार्जुन नावाच्या माणसाशी झाली. या दोघांनीची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. यानंतर सुमंगला आणि नागार्जुन या दोघांनीही शाकारमूर्तीची हत्या करण्याचा कट आखला. त्यांनतर २४ जूनच्या दिवशी सुमंगला आणि नागार्जुन दोघेही शाकारमूर्ती जिथे राहत होते तिथे गेले. त्यानंतर सुमंगलाने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्याच्या मानेवर पाय ठेवला आणि त्याला जबरदस्त मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला.
सुमंगला आणि तिच्या प्रियकराने शंकरमूर्तीची हत्या केल्यानंतर त्याचं प्रेत गोणीत भरलं आणि ती गोणी त्या घरापासून ३० किमी अंतरावर एका विहिरीत फेकून दिली. सुरुवातीला संकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यांनतर पोलिसांनी जेव्हा या घटनेचा कसून तपास केला तेव्हा त्याच्या अंथरुणात मिरची पावडरचे काही कण सापडले. तसाच त्याच्या अंथरुणाला अनेक सुरकुत्या पडल्या होत्या ज्यावरुन त्याने वाचण्यासाठी बहुदा बरीच तडफड केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शंकरमूर्तीची हत्या झाली आहे असं समजून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सुमंगलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा तिने आपणच पतीची हत्या केली असल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आणि पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.