crime (फोटो सौजन्य- pinterest)
भिवंडीतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड झाला आहे. अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी १७ जुलैला करण्यात आली.
Pune crime: घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरामध्ये बनावट अमूल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड, कासिमपुरा एका कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी अमूल कंपनीचे 100 ग्रॅम तसेच 500 ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले.
तिथे रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड वनस्पती तेल, मीठ, तसेच बटर फ्लेवर टाकून हँड मिक्सर मशीनचा वापर करून बनावट बटर तयार करण्यात येत होते. त्याठिकाणी त्यावेळी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम हे दोघे हा बनावट बटर बनवत होते. अन्नसुरक्षा अधिकारी करणे यांनी तेथील साहित्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन, त्याठिकाण हून एकूण 180 पाकिटे सह रिफाइंड पामुलीन तेलाचा 73.4 किलो तसेच वनस्पती तेलाचा 73.4 किलो साठा जप्त केलेला आहे. तसेच बनावट लेबलचे रिकामे पाकिटे,रिकामे कार्टून बॉक्स असा एकूण रुपये 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बनावट बटर तयार करण्याचे काम करणारे दोन्ही आरोपी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम यांना ताब्यात घेत त्यांच्यासह त्यांना मदत करणारे इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा कलमान्वये शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुबईत मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष देत महिलेवर केले वारंवार अत्याचार
दरम्यान, नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेला दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे अमिश देत तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी इद्रिस चौधरी याच्यावर या आधी देखील गुना दाखल करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
बीड हादरलं! प्रेयसीच्या घरी जाणे बेतले जीवावर; बेदम मारहाणीत २१ वर्षीय तरुणांचा मृत्यू