पुण्यातून गुन्हेगारीच्या धक्कदायक घटना समोर येत आहे. दिवसाढवळ्या हाणामारी, मारहाण, कोयत्याची दहशत, घरफोडी अश्या अनेक घटना पुण्यात घडत आहे. आता पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आला आहे. घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले आणि दरोडा टाकला. ही घटना बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार- पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे.
दरोडा टाकण्यात आलेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव चंद्रभान छोटूराम अग्रवाल असे आहे. ते निगडी प्राधिकरण परिसरात ते राहतात. घटनेच्या वेळी रात्री ते घरात एकटेच होते. हा सर्व प्रकार रात्री नऊच्या सुमारास थरार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार- पाच दरोडेखोर शिरले. दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. बांधकाम व्यवसायिक चंद्रभान यांचेही हातपाय बांधून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते. व्यवसायिक चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवत गॅलरीत येऊन आरडा ओरड केली. माहितीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारल्या. त्यांनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हात बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी धावून गेले. दरोडेखोर हत्यार बंद असल्याचे कळल्याने आत मध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली .माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले .मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते . रात्री उशिरापर्यंत बांधकाम व्यवसायिकाच्या बंगल्यासमोर पोलिसांचा ताफा उभा होता .अनेक नागरिकांची गर्दी देखील होती . पोलीसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .या घटनेत किती रक्कम चोरीला गेली ? सोनं नाणं केलंय का ? दरोडा नेमका कसा पडला ? याचा तपास सुरू आहे. दरम्यान पोलीस अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
बीड हादरलं! प्रेयसीच्या घरी जाणे बेतले जीवावर; बेदम मारहाणीत २१ वर्षीय तरुणांचा मृत्यू
दरम्यान, बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शिवम काशिनाथ चिकणे (२१ वर्ष) असे आहे. तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असतांना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्याच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
रेल्वेतच महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; विरोध करताच धावत्या रेल्वेखाली दिलं ढकलून