Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू

दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर भाजल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 02:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुण दारूच्या नशेत होता.
  • अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न.
  • गंभीर भाजल्याने रुग्णालयात दाखल.
  • उपचारादरम्यान मृत्यू.
नांदेड: नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुण हा फुल्ल दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेत स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं. त्यांनतर त्याने स्वतःला पेटवून घेतले. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा

मृतकाचे नाव शेख सलमान (वय 28) अशी करण्यात आली आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील डॉक्टर लेन भागात मंगळवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान हा दारूच्या नशेत डॉक्टर लेन परिसरात फिरत होता. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आग लागल्यानंतर सलमान वेदनेने ओरडत रस्त्यावर धावू लागला आणि मदतीसाठी वर्धीत होता. मात्र परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. घटनेवेळी उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली.

उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या शेख सलमाला त्वरित नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो ९० टक्के भाजला होता. त्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरनी त्याच्यावर उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हिडिओत काय?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जळत असलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक लोक प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना असे व्हिडीओ शेअर करू नयेत असे आवाहन केले आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेख सलमान दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली, त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस मृतकाच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेत असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणांमधील व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: दारूच्या नशेत तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Que: त्याची प्रकृती कशी होती?

    Ans: तो गंभीर भाजला होता आणि रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • Que: शेवटी काय झाले?

    Ans: उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Nanded crime extreme step taken under the influence of alcohol a young man committed suicide by dousing himself with petrol he died during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून
1

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू
2

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या
3

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
4

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.