CRPF शाळेजवळ स्फोट की षडयंत्र? दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, पोलीस ठाण्यांनाही सूचना (फोटो सौजन्य-X)
दिल्लीतील रोहिणी उपनगरातील प्रशांत विहार परिसरात रविवारी सकाळी स्फोट झाला. सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. शाळेजवळ हा स्फोट कसा झाला आणि त्यामागे काही षडयंत्र आहे का? या प्रश्नांची उत्तरे दिल्ली पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) हे केंद्रीय सुरक्षा दल असून शाळेजवळ स्फोट झाल्यामुळे कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्याा माहितीनुसार, बॉम्ब स्फोच करणाऱ्या आरोपीला एजन्सीला काही संदेश आणि सिग्नल द्यायचा होत का? तसेच आरोपींनी सीआरपीएफ शाळेची भिंतच का निवडली? हा बॉम्ब पेरणे हा संदेश देण्यासाठी असू शकतो. संशयिताने सकाळची वेळ निवडली. त्यांनी मध्य दिल्लीत किंवा गर्दीच्या वेळी बॉम्ब पेरणे निवडले नाही. पहाटे ज्या पद्धतीने बॉम्ब पेरण्यात आला आणि भिंतीच्या बाजूला ठेवण्यात आला त्यावरून संशयिताचा हेतू स्पष्ट होतो. त्यांचा उद्देश फक्त संदेश पाठवायचा होता,त्यांना कोणतीही मोठी हानी पोहचवायची नव्हती.
घटनास्थळावरून तपास यंत्रणांना पांढरी पावडर सापडली आहे. हा घरगुती बॉम्ब असून त्याला क्रूड बॉम्ब म्हणतात असा संशय आहे. अमोनियम फॉस्फेट आणि काही रसायने मिसळून हा बॉम्ब बनवला गेला असावा. स्फोटानंतर एफएसएल, सीआरपीएफ आणि एनएसजीने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. तपासणीनंतर रसायनाचा अचूक शोध घेतला जाईल. तेथे काही वायर सापडल्या आहेत पण त्या आधीच घटनास्थळी होत्या की नाही, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी तपास यंत्रणा केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. कट आणि दहशतवादाच्या कोनातूनही तपास सुरू आहे.
सीआरपीएफ शाळेत पाच श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सीआरपीएफ अधिकाऱ्यांची मुले, सीआरपीएफच्या निवृत्त आणि अपंग अधिकाऱ्यांची मुले, इतर निमलष्करी दलांच्या (आयटीबीपी, बीएसएफ इ.) सैनिकांची मुले, संरक्षण दलात नियुक्त अधिकाऱ्यांची मुले आणि जागा शिल्लक राहिल्यास सेवा नसलेल्या लोकांना शाळेत प्रवेश दिला जातो. लोकांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. सीआरपीएफ शाळा आयजी सीआरपीएफ प्रशासनाच्या देखरेखीखाली चालते.