File Photo : Suicide
मुंबई : गोवंडी (Gowandi) येथे एकाच घरात चार मृतदेह (Deadbody) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे. शिवाजीनगर भागात ही घटना घडली असून या चार मृतदेहांपैकी दोन लहान मुलांचा सामावेश आहे.
दरम्यान, ७ आणि ३ वर्षांच्या मुलांची हत्या केल्यानंतर पती – पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोवंडीतील शिवाजीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टी (Indira Nagar Slum) परिसरात शकील खान आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी खान आणि कुटुंबातील (Family Suicide) अन्य तिघांचे मृतदेह आढळले.






