सौजन्य फोटो - ,सोशल मिडीया
अपघाताची माहिती मिळताच मुगाव येथील स्थानिक युवक आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक खोल दरीत कोसळल्याने आणि आगीची तीव्रता प्रचंड असल्याने सुरुवातीला स्थानिकांना चालक दिसला नाही. मात्र, मुगावच्या काही धाडसी युवकांनी जीवाची पर्वा न करता खाली उतरून पाहणी केली असता, चालक सागर इंदलकर हे आगीत पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची पकड इतकी तीव्र होती की चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील डोंगरावरील झाडीनेही पेट घेतला असून आग सर्वत्र पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, ट्रक अतिशय खोल दरीत असल्यामुळे आणि धुराचे लोट तसेच आग प्रचंड असल्याने पोलिसांना आणि स्थानिकांना पाहणी व बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Ans: ब्रेक फेल झाल्यामुळे ऊसाचा एक मोकळा ट्रक दरीत कोसळला आणि त्याने पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाला.
Ans: या अपघातात ट्रक चालक सागर सोमनाथ इंदलकर यांचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Ans: ट्रकला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण डोंगराला आग लागली असून खोल दरी व आगीमुळे आष्टी पोलिसांना तपास व बचावकार्यात अडथळे येत आहेत.






