crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
एक महिला तिच्या घरात रूममेटचा मृतदेहा मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण फ्रान्सच्या कार्पेंट्रास शहरातील आहे. तिच्या शेजाऱ्यांना कुजलेला वास आल्यानंतर हा प्रकरण समोर आला.
नेमकं काय घडलं
एक २९ वर्षीय महिला एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी, पास्कल बी. नावाचा एक बेघर असलेला साठ वर्षांचा पुरूष तिच्यासोबत राहायला आला. परंतु लवकरच, शेजाऱ्यांना लक्षात आलं की महिला कुठेच दिसत नाही आहे. आणि तिच्या फेल्टमधून एक विचित्र, घाणेरडा वास येत आहे. शेजाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर, इमारतीच्या गार्डिअनने सफाई कामगारांना बोलावलं.सफाई कामगारांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि त्यांना जे घरातील दृश्य दिसले ते सर्वांनाच धक्का बसणारे होते. सोफ्यामध्ये कुजलेला आणि डोकं नसलेला एक मृतदेह त्यांना दिसला. तो मृतदेह पास्कल बी. चा असून तो गेल्या काही महिन्यांपासून तो त्या महिलेसोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत असल्याचं तपासात समोर आलं.
महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर
पोलिसांच्या तपासणीत आरोपी महिला ही मानसिक दृष्ट्या अस्थिर असून ती स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर या सारख्या गंभीर आजारांनी ग्रासली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिला बऱ्याचदा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आला आहे. जेव्हा महिलेला पास्कलच मृतदेह आढळलं तेव्हा तिने त्याचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या अवस्थेत ठेवला जणू तो जिवंतच आहे, असं म्हटलं जात आहे.
कुजायला सुरुवात झाली आणि…
काही दिवसांनंतर तो मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आणि त्यावेळी महिलेने तो सोफ्याच्या बेडमध्ये लपवला. महिला बऱ्याच काळ्या प्लास्टिक पिशव्या फेकताना दिसली ज्यामध्ये कदाचित पास्कलचे डोके आणि शरीराचे अवयव असल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
महिलेला अटक झाली परंतु…
अखेर, सखोल चौकशीनंतर लिलूला अटक करण्यात आली. सुरुवातीला तिच्यावर हत्येचा आरोप लावण्याच आला होता, परंतु पुराव्याअभावी हे सिद्ध होऊ शकलं नाही. खरंतर, लिलूची मानसिक स्थिती आणि बालपणात त्याने भोगलेल्या छळाचा विचार करून न्यायालयाने तिला चार महिन्यांची सस्पेंडेड शिक्षा सुनावली.