Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

पैशांच्या व्यवहारामुळे दोन जिवलग मित्रांमध्ये निर्माण झालेला दुरावा तब्बल दहा वर्षे कायम होता. ४ लाख ८५ हजार रुपयांच्या व्यवहारावरून सुरू झालेला हा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. दहा वर्षांनंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी संवादाचा मार्ग स्वीकारला आणि वादावर अनोखा तोडगा निघाला. तडजोड होताच दोन्ही मित्रांनी एकमेकांना गळाभेट दिली आणि

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 26, 2026 | 06:43 PM
पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

Follow Us
Follow Us:
  • हातउसने घेतलेल्या ४ लाख ८५ हजार रुपयांवरून दहा वर्षे न्यायालयीन वाद
  • दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या पुढाकाराने अडीच लाख रुपयांत तडजोड
  • वाद संपताच दोन्ही मित्रांची गळाभेट; डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
पुणे:पैशांच्या व्यवहारातून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, संवाद आणि समजुतीने हा दुरावाही दूर करता येतो, याचा प्रत्यय पुण्यातील एका प्रकरणातून आला. हातउसने घेतलेल्या ४ लाख ८५ हजार रुपयांवरून दोन जिवलग मित्रांमध्ये सुरू असलेला तब्बल दहा वर्षांचा न्यायालयीन वाद अखेर मिटला. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी पुढाकार घेत घडवून आणलेल्या तडजोडीत अडीच लाख रुपयांवर समझोता झाला. वाद संपल्यानंतर दोन्ही मित्रांनी एकमेकांना गळाभेट दिली. या भावुक क्षणी दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.

रितेश आणि हितेश (नावे बदलली आहेत) हे दोघे पुण्यात वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची गेल्या नऊ-दहा वर्षांपासून घट्ट मैत्री होती. हितेशचे गॅरेजही होते. व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यानंतर त्याने रितेशकडे आर्थिक मदत मागितली.

Accident News: सुपौलमध्ये भरधाव कारने कीर्तन करणाऱ्या भाविकांना चिरडले; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

विश्वासाने दिले ४.८५ लाख

मित्रावरील विश्वासापोटी रितेशने जून आणि जुलै २०१५ मध्ये बँकेतून पैसे काढून हितेशला ४ लाख ८५ हजार रुपये हातउसने दिले. दोन ते तीन महिन्यांत ही रक्कम परत करण्याचे हितेशने मान्य केले होते. मात्र, ठरलेली मुदत उलटूनही पैसे परत न मिळाल्याने रितेशने हितेशकडे पैशांची मागणी सुरू केली.

यानंतर जानेवारी २०१६ मध्ये हितेशने ४ लाख ८५ हजार रुपयांचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरित झाला. त्यानंतर दोघांमधील वाद वाढत गेला आणि अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

दहा वर्षे सुरू होता न्यायालयीन संघर्ष

१६ मार्च २०१६ पासून सुरू झालेला न्यायालयीन संघर्ष तब्बल दहा वर्षे सुरू राहिला. या काळात पैशांच्या व्यवहारामुळे दोन्ही मित्रांमधील पूर्वीची घट्ट मैत्रीही दुरावली. एका पैशांच्या व्यवहारामुळे अनेक वर्षांचे नाते तुटण्याच्या मार्गावर गेले.

वकिलांनी घडवून आणला संवाद

दहा वर्षांपासून सुरू असलेला हा वाद केवळ कायदेशीर मार्गाने न सोडवता मैत्रीच्या नात्यानेही मिटवता येईल, असा विचार दोन्ही पक्षांच्या वकिलांनी केला. फिर्यादीचे वकील ॲड. परीक्षित बडे आणि आरोपीचे वकील ॲड. सुधीर मुळे यांनी दोन्ही मित्रांमध्ये संवाद घडवून आणला.

दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्यानंतर परस्पर संमतीने तडजोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर ४ लाख ८५ हजार रुपयांच्या व्यवहारावर अडीच लाख रुपयांत समझोता झाला आणि दहा वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन वाद संपुष्टात आला.

Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

गळाभेटीत दहा वर्षांचा दुरावा संपला

वाद मिटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रितेश आणि हितेश यांनी जुने मतभेद बाजूला ठेवले. दोघांनीही एकमेकांना गळाभेट दिली. दहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या मित्रांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पैशांमुळे तुटलेले नाते अखेर संवाद आणि समजुतीमुळे पुन्हा जुळले. या घटनेने न्यायालयीन वादापलीकडेही मानवी नात्यांची किंमत अधोरेखित केली.

Web Title: Friendship severed over money rekindled after 10 years dispute over 485 lakh settled for 25 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
2

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
3

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या
4

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.