Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

बौद्धिक दिव्यांग मुलीला मोटारीत बसवले. त्यानंतर निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदे परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2026 | 01:09 PM
गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • १४ वर्षीय बौद्धिक दिव्यांग मुलीवर अत्याचार
  •  गाडीवरील स्टिकरवरून आरोपीचा माग काढला
  • अवघ्या बारा तासांत आरोपी गजाआड
पिंपरी : अधिक लाकडे गोळा करून देण्याचे आमिष दाखवून आणि हातावर शंभर रुपये टेकवून १४ वर्षीय बौद्धिक दिव्यांग मुलीला मोटारीत बसवले. त्यानंतर निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदे परिसरात उघडकीस आला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुसट दिसणाऱ्या मोटारीवरील खासगी ‘स्टिकर’चा धागा पकडत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. हाशिम अश्रफ शेख (वय २३, रा. हनुमान चौक, शेळकेवाडी फाटा, घोटावडे, पुणे; मूळ रा. बनिहाल, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारी दुपारी लाकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी त्या रस्त्याने मोटारीतून जाणाऱ्या आरोपीने तिला एकटे असल्याचे पाहिले. मुलगी लाकडे गोळा करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आणखी लाकडे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी तिला शंभर रुपयेही दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी मोटारीत बसली. त्यानंतर आरोपीने तिला मुळखेडच्या पुढील निर्जन डोंगराळ परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर त्याने मुलीला पुन्हा आणून सोडले.

मुलीची रक्तबंबाळ अवस्था पाहून एका महिलेने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सुरुवातीला घटनास्थळाच्या हद्दीवरून हा कॉल पुणे ग्रामीण पोलिसांकडे वळविण्यात आला. मात्र, पडताळणीनंतर प्रकरण बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच बावधन पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.

पीडित मुलगी बौद्धिक दिव्यांग असल्याने तिला घडलेला प्रकार सविस्तर सांगता येत नव्हता. गुंडाविरोधी पथकाने तिला विश्वासात घेऊन संवाद साधला असता तिने पांढऱ्या रंगाच्या मोटारीचा उल्लेख केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले. चार ते पाच संशयित मोटारींचे क्रमांक मिळाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात आली. त्यातील एका मोटारीवरील खासगी कंपनीचे स्टिकर पुसटसे दिसत होते. मुलीनेही संबंधित मोटार ओळखली. स्टिकर आणि वाहन नोंदणीच्या आधारे तपास केला असता ती मोटार बावधन येथील एका कंपनीची असल्याचे समोर आले.

गुंडाविरोधी पथकाने संबंधित कंपनी गाठली असता संशयित मोटारीसह आरोपी हाशिम शेख तेथे मिळून आला. सुरुवातीला त्याने मुलीला केवळ लिफ्ट दिल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या

अवघ्या बारा तासांत आरोपी गजाआड!

पीडित मुलगी बौद्धिक दिव्यांग असल्याने आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे सुरुवातीला ठोस माहिती नव्हती. अशा परिस्थितीत गुंडाविरोधी पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली. परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची छाननी, संशयित वाहनांची पडताळणी आणि संबंधित कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. मर्यादित माहिती असतानाही तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावल्याने पथकाचे कौतुक होत आहे.

Web Title: The police have arrested the accused in the case of outraging the modesty of a girl with a disability nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
1

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या
2

नाशिकच्या द्वारका परिसरात रक्तरंजित थरार! ३८ वर्षीय वाहनचालकाची दगडाने ठेचून हत्या

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित
3

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.