Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड; शॅम्पू, डिटर्जंट पावडरसह मोठा साठा जप्त

तपासात अवघ्या पाच रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून तयार होणारे हे दूध तब्बल ७० रुपये प्रतिलिटर दराने बाजारात विकले जात असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2026 | 01:01 PM
मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

Follow Us
Follow Us:

मंचर : महाराष्ट्राला हादरवणारी घटना मंचरमध्ये घडली. मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला असून, ५ रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून ७० रुपयांना विषारी दूध विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवसायातून जवळपास वर्षाला दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल गेल्या सहा-सात वर्षांपासून चालू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मंचर परिसरातील बनावट व कृत्रिम दूध तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ४ व ५ जुलै रोजी झालेल्या या धाडीत मंचर येथील मेसर्स नवकार डिस्ट्रीब्युटर्स या आस्थापनातून दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पावडरी, डिटर्जंट, विविध रसायने आणि इतर साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तसेच पिंपळगाव खडकी येथील एका डेअरी फार्म येथे तयार करण्यात आलेले सुमारे २७६७ किलो कृत्रिम दूध जप्त करून ते नष्ट करण्यात आले.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृत्यूचे तांडव ! भूंकपामुळे 3,500 हून अधिक मृत्यूमुखी; हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली

ोकृत्रिम दूध तयार करण्यासाठी प्रथिनयुक्त पावडर, स्निग्धांश वाढविणारी खाद्यतेले, तसेच दूध अधिक पांढरे व घट्ट दिसावे यासाठी डिटर्जंट, शाम्पू आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, हे मिश्रण मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

26 जणांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी सुशांत बबनराव हिंगे (मंचर), संदीप लोढा (मंचर), हेमंत टेके (अकलूज) आणि संजोग यादव यांच्यासह एकूण २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या रॅकेटचे जाळे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांपर्यंत पसरल्याचा संशय आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, वितरण साखळी, डिजिटल पुरावे आणि इतर संबंधित व्यक्तींचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Gang arrested in manchar due to adulterating milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Adulterating Milk
  • Food Poison
  • Manchar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.