पुण्यात अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या ताब्यात, व्हिडिओ करत मागितली माफी
हल्ली पुण्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढताना दिसत. कधी कुठे शुल्लक कारणांमुळे मारामारी होत आहे तर कुठे कंपनीत कंत्राट मिळावे म्हणून मारामारी होत आहे. अशातच काही तासांपूर्वी पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नल परिसरात एका तरुणच अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गौरव आहुजा नामक तरुणाचा हा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पुणे पोलीस देखील गौरव आहुजाचा तपास करण्यात गुंतली होती. पण आता गौरव आहुजाचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो त्याने केलेल्या अश्लील कृत्याबद्दल माफी मागत आहे. तसेच गौरव आहुजा लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
“मी गौरव आहुजा, आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर माझ्याकडून एक अत्यंत चुकीचं कृत्य घडलं. हे कृत्य खूप वाईट होतं आणि त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांच्याकडूनही माफी मागतो. कृपया मला माफ करा, मला एक संधी द्या, सॉरी… तसंच, मी लवकरच पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार आहे. कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, अशी विनंती मी करत आहे.”
गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं भोवलं; 4 पोलीसांचे तडकाफडकी निलंबन
पुण्यात भर चौकात लघुशंका आणि अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा हा मनोज आहुजा यांचा मुलगा आहे. दोन्ही पितापुत्रांची गुन्हेगारीची पाश्वभुमी आहे. तसेच अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजावर जुगाराचा गुन्हा दाखल आहे. याव्यतिरिक्त, त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 साली दाखल करण्यात आला होता. तेव्हा गौरव आहुजा फक्त 20 वर्षाचा होता.