Gold stolen at knifepoint from house in Kolhapur
कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील दोन घरात शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने आणि रोख पन्नास हजार रुपये लंपास केली आहे. अज्ञात व्यक्तीने धाक दाखवून हा प्रकार करुन पलायन केले. दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घराला आतून असलेली कडी कटावणीने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
चोराने अशा पद्धतीने दार उघडल्यामुळे दरवाज्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली चेन हिसकावून घेऊन पलायन केले. यानंतर चोरट्यांनी तळसंदे-वारणानगर रोडवरील सीमा बायोटेक नजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. बाळासाहेब व त्यांच्या पत्नी नातेवाईकांच्या घरी गेले होते. मुलगा सुधीर हा देखील बाहेरगावी गेला होता. त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते, मात्र घरी त्यांची सून प्रीतम, नात सिद्धी घरी होते. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडो तोडून आत प्रवेश केला. यावेळी एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. दरम्यान दुसऱ्या खोलीत झोपलेल्या प्रीतम व सिद्धी ह्या चोरट्यांच्या आवाजाने जाग्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू व कोयत्याचा धाक दाखवत तिजोरी फोडली. तिजोरीतील अठरा तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये घेऊन पलायन केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव पोलिसांकडून तपास सुरु
प्रीतम व सिद्धी यांनी आरडोओरड केल्याने शेजारी जागे झाले. मात्र चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे संपूर्ण गाव जागे झाले. तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले. दोन्ही घरातील मिळून साडेअठरा तोळे सोने व रोख ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास वडगाव पोलिस करत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात पार्क करण्यात आलेल्या रिक्षाच्या चाकांची चक्क चोरी करण्यात आली आहे. घर फोडणाऱ्या चोरट्यांनी ‘कमाल’च केली असून, बंद घरे, दुकाने अन् गोडाऊन फोडत असतानाच चक्क मार्केटयार्ड परिसरात पार्क केलेल्या तीन रिक्षांचे चाके काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीसही चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी हडपसरमध्ये स्टुडिओ, तर विश्रांतवाडी, बाणेरमध्ये बंद घरे फोडली आहेत. सोबत कोंढव्यात एक मेडिकल फोडल्याचे गुरूवारी दाखल गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे. याप्रकरणात मात्र, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद नाही. तक्रार देण्यास कोणी न आल्याने नोंद नसल्याचे सांगण्यात आले. मार्केटयार्ड भागातून पार्किंगमध्ये उभा केलेल्या ३ रिक्षांची चाकेच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. आता प्रकरणात नेमके गुन्हा दाखल होतो का, आणि पोलीस चाके चोर चोरट्याला पकडतात का, हे पहावे लागणार आहे.