
धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार
अहिल्यानगर : कळंब ते पिंपरी-चिंचवड बसमध्ये करंजी शिवारात मद्यपान केलेल्या एका गुंडाने माणुसकीची हद्द पार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्याच्या नशेत असलेल्या प्रवाशाने बसमधील एका दिव्यांग महिलेच्या अंगावर लघुशंका केली. महिलेने त्याला जाब विचारला असता त्याने तिला दमदाटी केल्याचेही समोर आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पोलिसांनी बस थांबवून संबंधित गुंडाला खाली उतरवून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. धाराशिव जिल्ह्यातील कळंब- पाथरी ते पिंपरी-चिंचवड बस पाथर्डी अहिल्यानगरमार्गे पुण्याला निघाली होती. बसमधून दिव्यांग महिला व त्यांची मुलगी प्रवास करत होती. उमापूर येथून सुमारे २६ वर्षांचा तरुण बसमध्ये बसला. बस पाथर्डी करंजीमार्गे अहिल्यानगरकडे येत होती. तळीराम गुंड बसमध्ये बसला तेव्हा त्याचा तोल जात होता. तो बसमधील दोन्ही सिटांच्या मध्यभागी असलेल्या जागेत झोपला.
धावत्या बसमध्येच तो अचानक उठला आणि त्याने महिलेच्या अंगावर लघुशंका केली. प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने महिलेसह प्रवाशांना दमदाटी केली. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. सदर महिलेने धावत्या बसमधून डायल ११२ वर कॉल केला. पाथर्डी पोलिस ठाण्याचे कर्मचारी करंजीत दाखल झाले. पोलिसांनी तळीरामाला खाली उतरवून चोप दिला. तळीरामानेही त्याच्या काही मित्रांना बोलावून घेत प्रवाशांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने दगडाने ठेचून एकाला संपवलं
पिंपरी-चिंचवड शहरातील कासारसाई येथे दारू पिऊन झालेल्या वादातून महिलेने दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कासारसाई-कुसगाव रोडवरील कृष्ण मंदिरापुढील वनविभागाच्या जागेत घडली आहे.