Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gopal Khemka Murder : व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या; हत्येचं CCTV फुटेज आलं समोर

बिहारची राजधानी पटना येथे एक धक्कादायक घटना घडली असून, भाजपाशी संलग्न आणि व्यावसायिक असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2025 | 08:32 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बिहारची राजधानी पटना येथे एक धक्कादायक घटना घडली असून, भाजपाशी संलग्न आणि व्यावसायिक असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पनाशे हॉटेलजवळील द्विन टॉवर सोसायटी परिसरात ४ जुलैच्या रात्री घडली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Crime News : जुन्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…

सीसीटीव्हीमध्ये काय दिसले?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, काळा हेल्मेट आणि निळा शर्ट घातलेला एक दुचाकीस्वार खेमका यांच्या निवासस्थानाबाहेर वाट पाहत थांबलेला होता. गोपाल खेमका यांची कार त्यांच्या घराच्या गेटसमोर थांबलेली होती, कारण गेट बंद होता. हीच वेळ साधून, त्या व्यक्तीने थेट कारच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या खेमका यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. सीसीटीव्हीमध्ये घरातील सुरक्षा रक्षक गेटकडे चालताना दिसतो. गेट उघडताच, खेमका हे मृतावस्थेत कारमध्ये पडल्याचे दिसून आले. .

 

VIDEO | Patna, Bihar: Prominent businessman Gopal Khemka was shot dead near his residence in Patna by a bike-borne assailant late Friday. CCTV visuals of the incident.#PatnaNews #BiharNews (Viewers discretion is advised) (Source: Third Party) pic.twitter.com/4prOkBy3zH — Press Trust of India (@PTI_News) July 5, 2025

मागच्या गाडीत महिला आणि पुरूषाची गडबडीत बाहेर

खेमका यांच्या गाडीच्या मागे उभी असलेल्या दुसऱ्या कारमधून एक महिला आणि एक पुरुष घाईघाईने बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. या घटनेत खेमका यांचा जागेवरच मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू

घटनास्थळी एक गोळी आणि एक रोल जप्त करण्यात आला आहे. एसपी दीक्षा यांनी सांगितले की, “४ जुलैच्या रात्री ११ वाजता माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. परिसर सील केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.” पोलिसांनी तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमले आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पूर्वीही खेमका कुटुंबावर झाला होता जीवघेणा हल्ला

या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, डिसेंबर २०१८ मध्ये गोपाल खेमका यांचे सुपुत्र गुंजन खेमका यांचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. गुंजन यांची हाजीपूर औद्योगिक परिसरात त्यांच्या कारखान्याबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली होती. सहा वर्षांनंतर पुन्हा अशीच हत्या वडिलांची झाली असून, त्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर भाजपाने मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली, तर विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

कमी दारु दिल्याचा राग; कामगाराने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन केला खून

Web Title: Gopal khemka murder businessman gopal khemka shot dead cctv footage of the murder surfaced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • crime
  • Murder

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू
1

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?
2

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?

Nandurbar: बाण–बांबू–ब्लेडने प्रसूती; दुर्गम भागांपर्यंत आरोग्य योजना न पोहोचल्याचा धक्कादायक दावा
3

Nandurbar: बाण–बांबू–ब्लेडने प्रसूती; दुर्गम भागांपर्यंत आरोग्य योजना न पोहोचल्याचा धक्कादायक दावा

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस
4

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.