६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून (संग्रहित फोटो)
सातारा : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड (ता. सातारा) येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होऊन झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथ दगडू पवार (वय ६०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
संशयित जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुकाराम वैजनाथ पवार (वय ४०, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत नानाजी कांबळे (वय ३२, रा. गडकर आळी, शाहूपुरी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते भंगार दुकान मालक आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ती समोर आली आहे.
जगन्नाथ पवार व तुकाराम पवार हे भंगार दुकानात काम करत होते. तेथेच भंगार दुकानाबाहेरील शेडमध्येच स्वत: स्वयंपाक करुन राहत होते. दोघांना दारु पिण्याची सवय आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दोघेजण दारु पित होते. दिनांक ३ जून रोजी रात्री भंगार दुकान मालकाने दुकान बंद केल्यानंतर दोन्ही कामगार नेहमीप्रमाणे रात्री शेडमध्ये दारु पिण्यास बसले. कमी दारु दिल्यावरुन वादावादी झाली. आणि हाणामारीही झाली. त्यातूनचं चिडलेल्या तुकाराम याने जगन्नाथ पवार यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकला. यात जगन्नाथ पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : कराडमध्ये दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; कारणही आलं समोर
पुण्यात पत्नीने केला पतीचा खून
चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्या पतीचा पत्नीने डोक्यात व शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे. ही घटना १० जुलै २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास साहील हाईट्स चिंधेनगर आंबेगावखुर्द येथे घडली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.