
बार्शीत ग्रामसेवकाची आत्महत्या
सोलापूर : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले. पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रकाश बाविस्कर असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा, असे येथील पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले. मात्र, कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?
प्रकाश बाविस्करांना त्यांचे काही वरिष्ठ या ना त्या कारणावरून छळत होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. याला कंटाळून त्यांनी १९ नोव्हेंबरला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
आत्महत्येच्या घटनेने एकच चर्चा
वरिष्ठ अधिकारी सातत्याने छळत असल्याने आणि पैशांची मागणी करत असल्याने या जाचाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकाने गळफास लावून आपले जीवन संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वरिष्ठांचा जाच आणि कर्मचाऱ्यांचा छळ हे अलिकडच्या काळात वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पूजाराचा मेहुणा जीत पाबारीची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूजाराचा मेहुणा जीत पाबारी याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराच्या कुटुंबावर या घटनेने मोठा धक्का बसला आहे. पूजाराचा मेहुणा जीत पाबारीने राजकोट येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे बोलेले जात आहे.
हेदेखील वाचा : Washim Crime: हृदयद्रावक! घरगुती वादातून पत्नीने विहिरीत मारली उडी; वाचवताना पतीचाही बुडून मृत्यू